शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटची आरोग्य सेवा सुरळीत करणार

By admin | Updated: July 20, 2014 23:59 IST

महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी मेळघाटातील आरोग्य सेवा सुधारण्याकरिता रविवारी मेळघाटदौरा केला. याप्रसंगी त्यांनी सुपर स्पेशालिटी

अमरावती : महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी मेळघाटातील आरोग्य सेवा सुधारण्याकरिता रविवारी मेळघाटदौरा केला. याप्रसंगी त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आढावा घेतला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा सुधारण्याचे निर्देश दिले.सुजाता सौनिक यांनी मेळघाटचा आढावा घेऊन थेट अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी केली. तेथील वॉर्ड व अतिदक्षता कक्षाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना योग्य निर्देश दिले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, सुपर स्पेशालिटीचे निकम, वीज वितरण कंपनी मोहोड यांच्यासह आदी आरोग्य सेवा देणारे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर सौनिक यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा आढावा घेत तेथील सभागृहात दौऱ्यासंदर्भांत चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवनिर्माण इमारतीमध्ये वीज उपलब्ध नसल्याचा मुद्यावर चर्चा केली. यावेळी तेथे उपस्थित वीज वितरणाचे अभियंता मोहोड यांच्याशी चर्चा करीत त्या म्हणाल्या की, विद्युत पुरवठा लगेच देणार नसाल तर आम्ही वीज हिसकावून घेऊ.त्यांनी मेळघाटमधील वीज पुरवठ्याबद्दल नाराजी व्यक्त केली व लवकरच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी सौनिक यांनी डॉक्टरांच्या कमतरतेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच तीन महत्त्वाच्या बाबी सर्वांसमोर मांडल्या. यामध्ये अत्यंत आवश्यक असणाऱ्या सुविधांमध्ये त्यांनी डॉक्टर, वीज व रक्त संकलन या तिन्ही बाबींवर प्रकाश टाकला व सर्व यंत्रणा सुधारण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. याकरिता डॉक्टर कंत्राटी पद्धतीने लावा. तसेच रक्त संकलनासाठी एनजीओची मदत घ्या, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)