शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थ्यांची आधार नोंदणी १०० टक्के करा

By admin | Updated: August 4, 2015 00:15 IST

महाराजस्व अभियानात अमरावती जिल्ह्यात विविध दाखले शिबिरे घेऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता ...

महाराजस्व अभियान : जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांचे आवाहनअमरावती : महाराजस्व अभियानात अमरावती जिल्ह्यात विविध दाखले शिबिरे घेऊन शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता आवश्यक असलेल्या आधार कार्डची १०० टक्के नोंदणी करावी तसेच शैक्षणिक व अन्य कामांसाठी लागणाऱ्या विविध स्वरुपाच्या दाखल्यांकरीता आवश्यक ते सर्व अर्ज व कागदपत्राबाबत जनतेस माहिती द्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केल्या.महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात १ आॅगस्टपासून महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात १४ लोकाभिमुख घटक गावपातळीवर प्रभाविपणे राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन येथील तहसिल कार्यालयाच्या वतीने ज्ञानमाता विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित आधार नोंदणी शिबिराचे उद्घाटन गित्ते यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर सामी, उपविभागीय अधिकारी प्रविण ठाकरे, तहसिलदार सुरेश बगळे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, संस्थेचे पर्यवेक्षक उल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, शासनाच्यावतीने शालेय विद्यार्थी तसेच सर्व सामान्य नागरिक, शेतकरी यांना अधिकाअधिक सोयी सुविधा उपलबध करुन देण्यासाठी महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. खऱ्या नागरिकांच्या ओळखीसाठी आधार कार्ड अत्यंत आवश्यक आहे. शालेय जिवनापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना उपयोगी आहे. विद्यार्थ्यांचा वेळ व श्रमाची बचत करण्यासाठी आधार नोंदणी शिबिरे जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. यासाठी इतरत्र फिरावे लागणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतच आधार कार्डची नोंदणी केली जाणार आहे. ज्ञानमाता विद्यालयात १६४१ विद्यार्थी असुन या सर्वांची आधार कार्डसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले. याशिवाय विद्यार्थ्यांना डोमेसिएल, जन्माचा दाखला आदी दाखले ही देण्यात येणार आहे. उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे म्हणाले की, महाराजस्व अभियान शाळेत सुविधा निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी ही त्यांच्या दारात जाऊन सुविधा पुरविण्यात येणार आहे.महसुल प्रशासन हा शासनाचा आरसा असुन अभियान काळात अधिकाअधिक सोयी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ज्ञानमाताचे मुख्याध्यापक सामी यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम आपल्या विद्यालयात हा उपक्रम घेतल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे आभार मानुन आगामी काळात विविध उपक्रम घेऊन अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे सांगितले. (प्रतिनिधी)