शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलचे केबल टाकताना मजीप्राची पाईपलाईन फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:01 IST

पंचवटी चौकात एका कंपनीकडून ‘फोरजी’ केबल लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी आधीच असलेली जीवनप्राधिकरणची पाईपलाईन फोडण्यात आली. मुख्य चौकातच हा प्रकार घडला.

ठळक मुद्देपंचवटी चौकातील प्रकार : स्पॉट व्हिजिट करण्याची सूचना

अमरावती: पंचवटी चौकात एका कंपनीकडून ‘फोरजी’ केबल लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी आधीच असलेली जीवनप्राधिकरणची पाईपलाईन फोडण्यात आली. मुख्य चौकातच हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांनी पाईपलाईन फुटल्याची बाब कंत्राटदाराच्या सुपवायझरच्या लक्षात आणून दिली. फुटलेली पाईपलाईन दुरूस्त करून देणार असल्याचे त्याने सांगितले. त्या ठिकाणी पुर्वीच जीवनप्राधिकरणाची व अन्य विभागाची केबललाईन टाकण्यात आली आहे. त्यावर आता मोबाईलची लाईन टाकण्याचे कामे सुरू आहे. तथापि या कामात नियोजन नसल्याने पाईपलाईनचे नुकसान झाले आहे. यासंबंधी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाने तातडीने पाहणी करून नोटीस बजावयला हवी हवी ,अन्यथा पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. येथील मुख्य चौकात खोदकाम सुरू असल्याने व तातडीने ते पुर्ववत न करण्यात येत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली.मजीप्राची परवानगी घेतली की कसे? याबाबत चौकशी करु. संबधित उपअभियंत्याला स्थळनिरीक्षण करुन तपासणीबाबत सूचना केली. अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.- सुरेश चारथळ,मुख्य अभियंता, मजीप्रा