शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘मजीप्रा’ची संथगती नागरिकांच्या मुळावर!

By admin | Updated: April 17, 2017 00:08 IST

भुयारी गटार योजना रखडविलेल्या मजीप्राचा करंटेपणा अमरावतीकरांच्या मुळावर उठला आहे.

मूलभूत सुविधांमधील रस्त्यांचे बांधकाम : इंगोलेंचे प्रशासनाला निवेदनअमरावती : भुयारी गटार योजना रखडविलेल्या मजीप्राचा करंटेपणा अमरावतीकरांच्या मुळावर उठला आहे. शहराच्या हृदयस्थानी राजकमल चौकात ‘मजीप्रा’कडून कार्यान्वित होणाऱ्या भुयारी गटाराच्या कामाच्या संथगतीने हा परिसर अपघातग्रस्त बनला आहे. त्या अनुषंगाने मूलभूत सुविधेच्या शासन निधीतून सुरू असलेल्या राजकमल चौक ते अंबागेट रस्ता निर्मितीचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी माजी महापौर विलास इंगोले यांनी प्रशासनाकडे केली आहे. या अन्वये आयुक्तांनी कंत्राटदारासह मजीप्राच्या संबंधित अधिकाऱ्याची कानउघाडणी करत ‘चेंबर’ उभारणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.मूलभूत सुविधा सन २०१५-१६ अंतर्गत ३.२५ कोटी रुपये खर्च करून राजकमल ते अंबागेट काँक्रीट रस्ता व नाली तसेच बाजूला फुटपाथ तयार करण्याचे काम तूर्तास सुरू आहे. यात खडीकरण, डांबरीकरण, नाली, विद्युतीकरण व फुटपाथ बांधकामाचा समावेश आहे. संबंधित कंत्राटदाराला याबाबत १८ आॅक्टोबर २०१६ ला वर्कआॅर्डर देण्यात आली. मात्र त्यानंतर हे काम आचारसंहितेत अडकले. काम नव्याने सुरू झाल्यानंतर ५४० मीटरचा हा रस्ता भुयारी गटार योजनेच्या दुष्टचक्रात अडकला. आता मजीप्राने राजकमल चौकातील रस्त्याच्या मोठ्या भागावर चेंबरसाठी खोदकाम करून ठेवले आहे. मात्र रस्ते निर्मिती आधीचे हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने हा परिसर अपघातग्रस्त झाला आहे. वाहने काढण्यासाठी या भागात केवळ एक चिंचोळी जागा असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात नुकताच एका शाळकरी विद्यार्थ्याचा अपघात घडल्याची बाब विलास इंगोले यांनी प्रशासनाच्या दृष्टीस आणून दिली आहे. या रस्त्याकरिता भुयारी गटार योजनेचा अडथळा निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)सुविधेसाठी की अपघातासाठीअमरावतीकर नागरिकांच्या तसेच अंबादेवी भक्तगणाच्या सोयीसुविधेच्या दृष्टीने या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती विलास इंगोले यांनी आयुक्तांकडे केली आहे, तथा या रस्त्याचे बांधकाम अमरावतीकरांच्या मुळावर उठून देण्याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी सूचनाही केली आहे.