शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्राची वसुलीही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 00:10 IST

पाचशे व हजारांच्या नोटा चलनासाठी मुदतवाढ मिळाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या ग्राहकांनी बिल देयके भरण्यासाठी गर्दी केली.

देयके भरण्यास गर्दी : दोन दिवसात ३० लाख जमाअमरावती : पाचशे व हजारांच्या नोटा चलनासाठी मुदतवाढ मिळाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांच्या ग्राहकांनी बिल देयके भरण्यासाठी गर्दी केली. गेल्या दोन दिवसात जीवन प्राधीकरणाकडे शेकडो ग्राहकांनी सुमारे ३० लाखांचे बिल देयकांची रक्कम जमा केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडे शहरातील ८७ हजार ५७६ ग्राहक असून या सर्व ग्राहकांना दररोज ९० ते १०० दशलीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या नळजोडणीधारकावर कोट्यवधीचे बिल देयके थकीत आहे. हे थकीत बिल भरण्यासाठी मजीप्राकडून अनेकदा ग्राहकांना सुचना देण्यात येते. मात्र, अनेक ग्राहक बिलाची रक्कम जमा करीत नाही. त्यामुळे ग्राहकांवर कोट्यवधीची थकबाकी आहे. मात्र, नुकताच शासनाने पाचशे व हजारांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे मजीप्राची वसुली मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्या ग्राहकांजवळ पाचशे व हजारांच्या नोटा आहेत, असे ग्राहक तत्काळ पाण्याचे बिल भरण्याकरिता जात आहे. त्यातच पाचशे व हजारांच्या नोटाचे चलनास १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाल्यामुळे मजीप्राचे ग्राहक बिल देयके चुकविण्यासाठी गर्दी करीत आहे.पाणी बिलाची रक्कम भरण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे. यादरम्यान थकीत बिलांचा भरणा करण्यात येत असल्याने वसुली वाढली आहे. त्यातच मजीप्राचे कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली सुध्दा करीत आहे. किशोर रघुवंशी, उपविभागीय अभीयंता, मजीप्रा.