शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
4
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
5
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
6
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
7
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
8
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
9
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
10
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
11
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
12
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
13
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
14
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
15
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
16
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
17
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
18
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
19
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

मजीप्राचे ‘जीवन’ धोक्यात

By admin | Updated: June 1, 2016 00:50 IST

येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ग्राहकांकडे ८५ कोटी रुपये पाणी पुरवठा देयकांचे थकबाकी असल्याने या यंत्रणेचे ‘जीवन’ धोक्यात आले आहे.

८५ कोेटी थकबाकी : महापालिकेवर चढविला बोझाअमरावती : येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ग्राहकांकडे ८५ कोटी रुपये पाणी पुरवठा देयकांचे थकबाकी असल्याने या यंत्रणेचे ‘जीवन’ धोक्यात आले आहे. परिणामी नागरिकांंना पाणी पुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास मजीप्राला गासे गुंडाळावे लागेल, असे संकेत आहे.राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने मराठवाड्यात आठवड्यातून एकदा तर अकोला, वाशिम, बुलडाणा आदी जिल्ह्यांमध्ये तीन ते चार दिवसांतून एकदा नळाद्वारे पाणी पुरवठा आजही सुरु आहे. मात्र यावर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमरावती शहरवासियांना पाणी टंचाईची जाणीव होऊ दिली नाही. नियमित पाणी पुरवठा करुन नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला. परंतु मजीप्राचे पाणी पुरवठ्याचे सुमारे ८५ कोटी रुपये देयकांचे थकबाकी असल्याने ते वसूल करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोट्यवधी रुपये थकबाकी असल्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत पायाभूत सुविधा पुरविणे मजीप्राला अशक्य होत असल्याचे वास्तव आहे. बडनेरा शहरात कालबाह्य झालेले जलकुंभ जमिनदोस्त करण्यात आले. त्यामुळे पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर झाली आहे. मजीप्राकडे निधी उपलब्ध असता तर पायाभूत सुविधांना प्राधान्य देता आले असते असे कार्यकारी अभियंता प्रशांत भामरे यांनी सांगितले. पाणी पुरवठा देयकांच्या थकबाकीसाठी आता कृ ति आराखडा तयार करण्यात आला आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाकडे स्टॅन्ड पोस्ट आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित देयकांचे ३५ कोटी रुपये थकबाकी असल्यामुळे महसूल विभागाने बोझा चढविला आहे. अद्यापही महापालिकेने देयकांची रक्कम अदा केली नाही. मात्र ही रक्कम वसूल करण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधला जात आहे. तसेच २५ हजार ग्राहकांकडे सुमारे ५० कोटी रुपये देयकांचे थकीत आहे. ५० कोटी रुपये ही रक्कम वसूल करण्यासाठी जप्तीपूर्वीची नोटीस बजावण्याचे ठरविले आहे. १० दिवसात ही रक्कम ग्राहकाने भरली नाही तर पाणी पुरवठा बंद करुन महसूल विभागाकडे कायदेशीर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्याकरिता स्वतंत्र एजन्सी नेमण्यात आल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.