शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाकूड तस्करीतील त्या मुख्य आरोपीस अखेर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

परतवाडा : अचलपूर पोलिसांनी लाकूड तस्करी प्रकरणातील वाहनासह सोडलेल्या मुख्य आरोपीस अखेर परतवाडा वनविभागाने अटक केली. चेतन सोनुकले (२३, ...

परतवाडा : अचलपूर पोलिसांनी लाकूड तस्करी प्रकरणातील वाहनासह सोडलेल्या मुख्य आरोपीस अखेर परतवाडा वनविभागाने अटक केली. चेतन सोनुकले (२३, रा. सुलतानपुरा, अचलपूर) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. अचलपूर पोलिसांनी सुलतानपुरालगतच्या नदीवरील पुलावर पकडलेले अवैध सागवान घेऊन आलेले वाहन सोडल्याची सविस्तर हकीकत वनविभागाला त्याने सांगितली. पण, यात वनविभागाला हवे असलेल्या त्या वाहनाची माहिती त्याच्याकडून मिळाली नाही.

चेतन सोनुकलेने अचलपूर पोलिसांच्या तावडीतून सोडवून घेतलेले सागवान सुलतानपुऱ्यातील प्रेमदास दाभाडे यांच्याकडे ठेवण्यास दिले. ही लाकडे परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ६ ऑगस्टलाच दाभाडे यांच्याकडून ताब्यात घेतले. तेव्हापासून वनविभाग चेतन सोनुकलेच्या मागावर होते. यादरम्यान सोनुकले याने अचलपूर न्यायालयाकडे अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला; पण न्यायालयाने तो फेटाळून लावला. तेव्हापासून तो फरार होता.

यापूर्वीही अटक

अवैध सागवान तस्करी प्रकरणात नोव्हेंबर २०२० मध्ये चेतन सोनुकलेसह स्वप्निल हिरुळकर यास परतवाडा वनविभागाने अटक केली आहे. याप्रकरणी लाकडांसह एक ऑटो व मोटारसायकल वनविभागाने ताब्यात घेतली आहे.

* अशीही गंमत

अवैध सागवान लाकूड तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी चेतन सोनुकले असताना अचलपूर पोलिसांनी मोठी रक्कम घेऊन वाहन सोडल्याची तक्रार पोलीस अधिकाऱ्यांकडे स्वप्निल हिरुळकर याने केली होती. या अनुषंगानेही स्वप्निल हिरुळकरचा या प्रकरणाशी असलेला संबंध चेतन सोनुकलेकडून वनविभाग जाणून घेत आहे.

अचलपूर परतवाड्यात तस्करी

मेळघाटसह मध्य प्रदेशातील व अंजनगाव वनपरिक्षेत्रातील अवैध सागवानाच्या तस्करीकरिता परतवाडा शहरात तस्करांचे हस्तक सक्रिय आहेत. हे हस्तक अवैध सागवान लाकूड घेणाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या मागणीनुसार लाकूड पुरवितात. अचलपूरमधील त्या लाकूड तस्करीत परतवाड्यातील अशाच काही हस्तकांची नावे पुढे आली आहेत. ही मंडळी अचलपूर परतवाड्यासह ग्रामीण भागात अवैध सागवान तस्करी करीत आहेत. या लाकूड तस्करीच्या अनुषंगाने ब्राह्मणवाडा थडी येथील काही मंडळीही चर्चेत आली आहेत.

कोट

अचलपूरमधील त्या प्रकरणाशी संबंधित मुख्य आरोपी चेतन सोनुकले यास अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा

दिनांक 22/09/21 फोटो दिनांक24/09/21 फोटो