अमरावती : भक्तांच्या भावनेला धक्का देणाºया मुरलीधर महाराजांच्या अश्लील चित्रफीत प्रकरणातील मुख्य आरोपी मोना अद्यापही मोकाटच आहे. महाराजांची अश्लील चित्रफीत बनविल्याची कबुली मोनाने दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी शफीक राजा यांना अटक केली होती, तर अन्य आरोपींना अभय दिले जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.तालुक्यातील येलकी पूर्णा येथील मुरलीधर महाराजांच्या मठात अश्लील चाळे चालत असल्याची तक्रार शफीक राजाने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. तशी चित्रफीतही दिली होती. या प्रकरणात महाराजांची अनुयायी असलेल्या ‘मोना’ने महाराजांची अश्लील चित्रफित बनविली असल्याची कबुली ‘इन कॅमेरा’ दिली. वर्षभरानंतर पोलिसांनी मोना झंवरवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वेळोवेळी समन्स दिले. मात्र, ती न्यायालयासमोर हजर झाली नाही. शुक्रवारी तिला न्यायालयासमोर हजर राहण्याची आणखी एक संधी मिळाली असून, ११ डिसेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. तपास दर्यापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे करीत आहेत.
मुख्य आरोपी ‘मोना’ मोकाटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:16 IST
भक्तांच्या भावनेला धक्का देणाºया मुरलीधर महाराजांच्या अश्लील चित्रफीत प्रकरणातील मुख्य आरोपी मोना अद्यापही मोकाटच आहे.
मुख्य आरोपी ‘मोना’ मोकाटच
ठळक मुद्देपोलीस तपास संशयात : मुरलीधर महाराज अश्लील चित्रफीत प्रकरण