शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या क्लिकसाठी ‘आई’ ठरली पासवर्ड!

By admin | Updated: June 4, 2014 23:20 IST

बारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सुकता कोणाला असणार नाही? परंतु ऑनलाईन निकाल प्रक्रियेत एका ‘क्लिक’आड दडलेले यशापयश जाणून

शिक्षण मंडळाचा अनोखा प्रयोग : गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न जितेंद्र दखने - अमरावतीबारावी म्हणजे आयुष्याचा ‘टर्निंग पॉईंट’. त्यामुळे वर्षभराच्या कठीण परिश्रमानंतर निकालाबाबतची उत्सुकता कोणाला असणार नाही? परंतु ऑनलाईन निकाल प्रक्रियेत एका ‘क्लिक’आड दडलेले यशापयश जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आईच्या नावाचा ‘पासवर्ड’ वापरावा लागला. निकाल जाणून घेताना संगणकीकृत पद्धतीच्या वापरामुळे होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने लढविलेली ही क्लृप्ती बर्‍याच अंशी यशस्वी ठरली. इतकेच नव्हे तर यामुळे यशप्राप्तीतही मुलांना आईचे विस्मरण झाले नाही आणि अपयशामुळे खचलेल्यांना आईच्या नावामुळे अप्रत्यक्ष बळही मिळाले. नुकतेच बारावीचे ऑनलाईन निकाल जाहीर झाले. संगणकावर केंद्र क्रमांक आणि रोलनंबर टाकून कुणालाही कुणाचा निकाल आतापर्यंत पाहता येत होता. त्यामुळे या पद्धतीचा गैरवापर सर्रास होत असल्याचे शिक्षण मंडळाच्या लक्षात आले होते. ही पध्दत गैरसोईची आणि पुरेशी पारदर्शक नसल्याचे स्पष्ट झाल्याने या पद्धतीमध्ये बदल करण्याचा विचार शिक्षण मंडळाने केला. त्यानुसार यंदाच्या वर्षापासून ‘ऑनलाईन’निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्याला ‘पासवर्ड’ म्हणून स्वत:च्या आईचे नाव टाकणे बंधनकारक करण्यात आले. आईचे नाव संगणकाने ग्राह्य धरल्यानंतरच विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास मिळाला. या नव्या उपक्रमामुळे निकाल बघताना होणार्‍या  गैरव्यवहारांना तर आळा बसलाच; पण  मुलांनाही आईच्या नावाचे महत्त्व कळणार आहे.  विद्यार्थ्यांच्या जीवनात बारावी परीक्षेचे असलेले महत्व लक्षात घेता यशाच्या पायरीवर चढताना विद्यार्थ्यांना आपल्या आईची कायम आठवण राहावी, ही कल्पकता शिक्षण मंडळाने यानिमित्ताने दाखविली आहे. २ जून रोजी शिक्षण मंडळातर्फे वेबसाईटवर निकाल पाहताना प्रत्येक विद्यार्थ्याला आईच्या नावाच्या पासवर्डचा वापर करून यशापयशापर्यंत पोहोचता आले.  या पध्दतीचा वापर करण्यासाठी शिक्षण मंडळाने निकालासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाईटमध्ये नव्या सॉफ्टवेअरचा वापर केला. शिक्षण मंडळाचा हा प्रयोग बर्‍याच अंशी यशस्वी ठरला.शिक्षण मंडळाने ‘आई’च्या नावाचा अशा कल्पक पध्दतीने वापर करून विद्यार्थ्याला आईची आठवण पासवर्डच्या रूपाने कंपल्सरी करून एक आदर्श प्रस्तुत केला.