चिखलदरा : तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी दुपारी १ वाजता तहसील कार्यालयात काढण्यात आले. यावेळी तहसीलदार माया माने, नायब तहसीलदार योगेश चंदनशिव, सी. जी. मोरे आदी अधिकाऱ्यांनी काढले. अनुसूचित जमाती महिला राखीव ग्रामपंचायती : खिरपाणी, अढाव, गडगाभांडूम, सेमाडोह, रायपूर, मोथा, आमझरी, कोयलारी, कुलंगणा खुर्द, सलोना, अंबापाटी, जामली (आर), रुईपठार, जामली (वन), गांगरखेडा, बदनापूर, बागलिंगा, शहापूर, धरमडोह, सोनापूर, बोराळा, हतरू, राहू, एकताई, आकी, भुलोरी, बामादेही. तर उर्वरित २६ ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमाती (खुला वर्ग महिला किंवा पुरुष) दोघांनाही सरपंच पदावर विराजमान होता येणार आहे. त्यामध्ये काटकुंभ, चिखली, तारूबांदा, खटकाली, बारूगव्हाण, बिबा, कोहाना, तेलखार, कोरडा, आडनदी, मोरगड, चिचखेडा, वस्तापूर, नागापूर, दहेंद्री, चुरणी, काकादरी, टेम्ब्रुसोंडा, मेहरीआम, आवागड, खडीमल, माखला, गौरखेडा बाजार, सोमवारखेडा, काजलडोह, डोमा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
---------