शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महावीर जयंती, हनुमान जयंतीला कार्यक्रमांना फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:12 IST

अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महावीर जयंती तसेच हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या ...

अमरावती : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महावीर जयंती तसेच हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वांनी शिस्त, संयम पाळून घरीच राहून उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत परिपत्रक अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी जारी केले आहे. महावीर जयंती २५ एप्रिल रोजी असून, हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जैन बांधव मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा करतात. मात्र, सध्याची कोरोना साथ लक्षात घेता, लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी राहून उत्सव साजरा करावा. सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याने पूजाअर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. मंदिर व्यवस्थापकांनी शक्य असल्यास दर्शनाची समाजमाध्यमांवर ऑनलाईन सुविधा द्यावी. कोणतीही प्रभात फेरी, मिरवणूक काढू नये, असे मार्गदर्शक सूचनांत नमूद आहे.

हनुमान जयंती उत्सव २७ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी एकत्र न येता घरीच राहून उत्सव साजरा करावा. कोणतीही प्रभातफेरी व मिरवणूक काढू नये. धार्मिक स्थळे बंद असल्याने भजन, कीर्तन, पठण आदी किंवा कुठल्याही कार्यक्रमांचे आयोजन करू नये. मंदिर व्यवस्थापकांनी शक्य असल्यास समाज माध्यमांद्वारे ऑनलाईन दर्शनाची सुविधा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.