शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र २०१९ पर्यंत दुष्काळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:10 IST

यंदा राज्यात निसर्गाची अवकृपा झाली. यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपंकजा मुंडे : आचारसंहितेमुळे भूमिपूजन नाही

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी/वरूड : यंदा राज्यात निसर्गाची अवकृपा झाली. यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, युती शासनाने केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे दुष्काळाच्या झळा शेतकºयांना बसलेल्या नाहीत. शेतकºयांच्या हितासाठी जलसंधारणाची कामे यापेक्षा जलद गतीने करून २०१९ पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू, असे प्रतिपादन राज्याच्या जलसंधारण, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मोर्शी येथे केले.मोर्शी पंचायत समितीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आलेल्या ना. मुंडे यांनी आचारसंहिता लागू झाल्यामुळे त्याचा सन्मान करीत भूमिपूजन करणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी उपस्थित नागरिकांना त्यांनी जनसंवाद सभेच्या माध्यमातून मार्गदर्शन कले.यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री, उद्योग व खनिकर्म मंत्री प्रवीण पोटे, खासदार रामदास तडस, मोर्शीचे आमदार अनिल बोंडे, काटोलचे आमदार आशिष देशमुख. दिनेश सूर्यंवंशी, जयंत डेहनकर, वसुधा बोंडे, नगराध्यक्ष शीला रोडे, संजय घुलक्षे, सारंग खोडस्कर, अनिल डबरासे, शरद मोहोड, शंकर ऊईके, सुनील कडू भाऊराव छापाने, आप्पा गेडाम आदी उपस्थित होते. शेतकरी, शेतमजूर, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आपण सर्व माझ्या पाठीचा कणा आहात, तुम्हा सर्वांच्या सर्व प्रश्नांची सोडणूक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. मोर्शी, वरूड तालुक्यातील शेतकºयांसाठी शासनाने संत्रा प्रक्रिया उद्योग सरकारने हाती घेतला असून तो लवकरच सुरू होईल, असे खा.रामदास तडस यांनी सांगितले. प्रास्ताविक आमदार बोंडे यांनी केले.देवेंद्र भूयार नजरकैदेतजरूड : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या वरूड दौºयावर येत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वाभिमानी पक्षाचे नेते व जि.प.सदस्य देवेंद्र भुयार यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलीस चौकी जरूड येथे स्थानबद्ध करून नजरकैदेत ठेवण्यात आले.जिल्ह्यात सोलर प्रकल्प : पालकमंत्री पोटेअमरावती जिल्ह्यात सोलर प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यातून विविध कामे केली जाणार आहेत. शेतकºयांना विजेच्या टंचाईचा सामना करावा लागतो. सोलर प्रकल्पामुळे तो कमी होईल असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोट पाटील यांनी केले. ते म्हणाले, महिलांना रोजगार प्राप्त व्हावे यासाठी महिलांना बचत गटांच्या माध्यामतून रोजगार मिळवून दिला जात आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेत वाढणाºया भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.