शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र

By admin | Updated: September 29, 2014 22:51 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र राज्यावर तीन लाख कोटी रूपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा विपरित स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कर्जाचे व्याज भरण्यात गुंडाळला जाईल की काय, अशी स्थिती

भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ : नितीन गडकरी यांचा आरोपतिवसा : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्र राज्यावर तीन लाख कोटी रूपये कर्जाचा डोंगर उभा केला आहे. अशा विपरित स्थितीत राज्याचा अर्थसंकल्प कर्जाचे व्याज भरण्यात गुंडाळला जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र या आघाडी सरकारच्या भ्रष्ट्राचारामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आला असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला.सोमवारी सायंकाळी तिवसा येथे आयोजित भाजपच्या जाहीरसभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अरूण अडसड, प्रवीण पोटे, मतदारसंघाचे निरीक्षक व लखनौ येथील महापौर दिनेश शर्मा, पद्माकर पाकोडे, जिल्हा सरचिटणीस दिनेश सूर्यवंशी, विजय पुनसे, इंद्रायणी थेटे, रिपाइं आठवले गटाचे अनिल गोंडाणे, भाजपचे तिवसा तालुकाध्यक्ष नंदलाल गंधे, रूपेश ढेपे, अमरावती तालुकाध्यक्ष मोहन तळकीत, भातकुली तालुकाध्यक्ष मनोज लोखंडे, सुरेश मुंधडा, संघटन मंत्री शिवराय कुळकर्णी, तालुका सरचिटणीस शेखर नंदनवार आदी उपस्थित होते. यावेळी राजीव जामठे यांनी गडकरींच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. सभेत पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राज्यात सिंचनावर ७० हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात सिंचन केवळ ०.०१ टक्क्यांनी वाढले, याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केला. राज्यात ८० हजार शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यांना जर वीज जोडणी मिळाली असती तर ८ ते १० लाख हेक्टर सिंचनाचे क्षेत्र वाढले असते. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला असता. विजेचे भारनियमनही सुरू आहे. वीज नाही म्हणून या भागात उद्योग यायला तयार नाही. एमआयडीसी ओस पडली. भूमिपुत्रांच्या हाताला रोजगार नाही, दररोज कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. गावात रोजगार नाही म्हणून लोक शहराकडे धाव घेत आहेत. गाव ओस पडेल की काय, अशी परिस्थिती काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारने आणली असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यात किमान १० हजार युवकांच्या हाताला रोजगार मिळेल असा उद्योग आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विकास फक्त काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा झाला, असा आरोप गडकरींनी केला. प्रास्ताविक निवेदिता चौधरी, संचालन व आभार प्रदर्शन जयंत डेहणकर यांनी केले.