शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

Maharashtra Election 2019 ; सहा दिवस, दोन हजार गावे, २४.४९ लाख मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 06:00 IST

गजानन मोहोड । लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराला केवळ सहा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यात आठही ...

ठळक मुद्देउमेदवारांच्या पायाला भिंगरी : अल्पावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराला केवळ सहा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. यात आठही मतदारसंघांतील दोन हजार गावे व २४ लाख ४९ हजार मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसब उमेदवारांना दाखवावी लागत आहे. यासाठी उमेदवारांच्या पायाला जणू भिंगरीच लागल्याची स्थिती सर्व मतदारसंघांत दिसून येत आहे.उमेदवारी चिन्हाचे वाटप ७ ऑक्टोबरला झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात बैठका, काही नेत्यांच्या भेटी, प्रचार कार्यालय आदी नियोजन झाल्यानंतर या दुसऱ्या टप्प्यात गावानगावांना भेटी देण्यावर बहुतांश उमेदवारांचा भर आहे. शहरी भागात प्रभागनिहाय संपर्कावर भर दिला जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार असल्याने त्याचे ४८ तास पूर्व म्हणजेच १९ तारखेला सायकांळी ५ नंतर प्रचार बंद करावे लागतील. त्यामुळे प्रचारासाठी उमेदवाराला फक्त सहा दिवस मिळणार आहे. काही उमेदवारांद्वारा प्रचारयात्रा काढण्यात येत आहे. या माध्यमातून मतदारासंघातील बहुतेक भागात पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच दरम्यान उमेदवारांचे समर्थकदेखील प्रचाररॅली काढत आहेत. उमेदवारांद्वारा कॉर्नर बैठका घेतल्या जात आहेत.जिल्ह्यात आठही मतदारसंघांत २४ लाख ४९ हजार ६० मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५९ हजार पुरुष, ११ लाख ८९ हजार ३७३ महिला व ४३ इतर उमेदवार आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघात ३ लाख १४ हजार ४५५ मतदार आहेत, बडनेरा मतदारसंघात ३ लाख ५५ हजार ६२२, अमरावती मतदारसंघात ३ लाख ४५ हजार ४६५, तिवसा मतदारसंघात २ लाख ९५ हजार ७५३, दर्यापूर मतदारसंघात २ लाख ९६ हजार ६५१, मेळघाट मतदारसंघात २ लाख ७७ हजार २०९, अचलपूर मतदारसंघात २ लाख ७४ हजार ७९९ व मोर्शी मतदारसंघात २ लाख ८९ हजार २७६ मतदार आहे. या सर्वापर्यत पोहोचण्याची कसरत आठ मतदारसंघातील १०९ उमेदवारांना करावी लागत आहे.महिनाभरात वाढले ३२९४ मतदारआठही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांद्वारा ३१ ऑगस्टला अंतिम मतदारयादीनुसार जिल्ह्यात २४ लाख ४५ हजार ७६६ मतदारसंख्या जाहीर करण्यात आली. त्यानंतरही नोंदणी ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू होती. या कालावधीत आठही मतदारसंघांत ३,२९४ मतदार वाढल्याने मतदारसंख्या ही २४ लाख ४९ हजार ६० एवढी झालेली आहे. या व्यतिरिक जिल्ह्यात ३२८२ सर्व्हीस व्होटर्स आहेत. त्यांना संबंधित मतदारसंघातील मतपत्रिका ‘इटीपीबीएस’ यंत्रणेद्वारे पाठविण्यात आलेली असल्याने मतदारसंख्या ही २४ लाख ५४ हजार ९७० झालेली आहे.जिल्ह्यात ३०८२ मतदार यादीतून वगळलेआठही मतदारसंघांत ३ हजार ८२ मतदारांना वगळण्यात आलेले आहे. यामध्ये १५५५ मतदार हे अन्य मतदारसंघात स्थलांतरीत झालेले आहेत तर १५२७ मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे कमी करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त ९२६५ दिव्यांग मतदार आहेत यामध्ये १६७५ दृष्टीबाधित आहेत, ९५९ मुकबधीर, ४५५२ बहुविकलांग व २३७९ इतर विकलांग यांचा समावेश आहे. या मतदारांणना घर ते मतदान केंद्रापर्यत जाणे व येण्यासाठी यावेळी मोफत वाहनांची सोय करण्यात आलेली आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती