लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मतदारसंघातील विकासकामांसह अपंग आणि रुग्णसेवेला गेल्या १५ वर्षांत प्राधान्य दिले आहे. आपल्या मतांमुळेच मी अपंगांसह रुग्णसेवा करू शकलो. आपल्या या मताचे पावित्र्य जपले जाईल. आपले मत सत्कर्मी लावेल, अशी ग्वाही बच्चू कडू यांनी गुलालबाग येथील प्रचारसभेत दिली.बच्चू कडू यांनी अपंगांच्या कल्याणासाठी अपंगांसमवेत अडीच वर्षे लढा दिला. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारला. गनिमी काव्याने अपंगांसोबत मंत्रालयासह मंत्र्यांच्या बंगल्यात घुसून ठिय्या दिला. मुख्यमंत्री, मंत्री, आयुक्तांशी अपंगांच्या प्रश्नावर बैठका घेतल्यात. अपंगांच्या कल्याणासाठी २० प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवत विधानसभेतही लढा दिला, असे बच्चू कडू यांनी सांगितले. अपंगांच्या कल्याणासाठी यानंतर अनेक नवीन शासन निर्णय निघालेत. काही शासननिर्णयात अपंगहिताचे बदल सरकारकडून केले गेलेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. रुग्णसेवेचा आढावा मांडताना मी डॉक्टर नाही; तरीही डॉक्टरसुद्धा रुग्णांना माझ्याकडे रेफर करताहेत. हीच प्रहारच्या रुग्णसेवेची पावती असल्याचे बच्चू कडू म्हणालेत.बच्चू कडू यांच्या अपंगसेवेसह रुग्णसेवेचा लेखाजोखा सतीश व्यास यांनी उपस्थितांसमोर मांडला. बच्चू कडू यांनी उभारलेल्या लढ्यामुळे अपंगहिताचे ११ शासन निर्णय केंद्र सरकारने एका दिवसात काढल्याची माहिती सतीश व्यास यांनी याप्रसंगी दिली. बच्चू कडू यांचा दवाखाना वेगळाच असून, ते वेगळेपण समाजाभिमुख व गरजूंसह गोरगरिबांच्या हिताचे असल्याचे मत दीपक गुल्हाने यांनी व्यक्त केले. याप्रसंगी गोपाल लुल्ला, अजय अग्रवाल, सुरेश अटलांनींसह अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. संचालन संतोष नरेडी व आभार प्रदर्शन सतीश व्यास यांनी केले.
Maharashtra Election 2019 ; आपल्या मतांचे पावित्र्य जपले जाईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST
बच्चू कडू यांनी अपंगांच्या कल्याणासाठी अपंगांसमवेत अडीच वर्षे लढा दिला. प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या माध्यमातून लढा उभारला. गनिमी काव्याने अपंगांसोबत मंत्रालयासह मंत्र्यांच्या बंगल्यात घुसून ठिय्या दिला. मुख्यमंत्री, मंत्री, आयुक्तांशी अपंगांच्या प्रश्नावर बैठका घेतल्यात. अपंगांच्या कल्याणासाठी २० प्रमुख मागण्या सरकारपुढे ठेवत विधानसभेतही लढा दिला, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
Maharashtra Election 2019 ; आपल्या मतांचे पावित्र्य जपले जाईल
ठळक मुद्देबच्चू कडू यांची ग्वाही : अपंगांसह रुग्णसेवेला प्राधान्य