शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Maharashtra election 2019 ; मतदारसंघात विकासकामांचा खासदारांनी केला जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 06:00 IST

ग्रामीण मतदारांशी संवाद साधताना खासदार नवनीत राणा यांनी सांगितले की, बडनेरा मतदारसंघाचा गत १० वर्षांत झालेला विकास हा अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. अतिदुर्लक्षित भातकुली परिसरात झालेली विविध विकासकामे ही ग्रामीण जनतेला विश्वास देत आहेत. लोकसभेत पहिल्याच अधिवेशनात श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना मिळणाऱ्या तोकड्या ६०० रुपयांऐवजी १२०० रुपये अनुदान करण्यास केंद्र सरकारला भाग पाडले.

ठळक मुद्देविकासासाठी कटिबद्ध : निराधारांना वाढीव अनुदान मिळवून देण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा मतदारसंघातील महाआघाडी, युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ भातकुली येथे बुधवारी जाहीर सभा पार पडली. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी मतांचा जागर केला. मंचावर खासदार नवनीत राणा, रवि राणा व पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, ग्रामीण मतदारांशी संवाद साधताना खासदार नवनीत राणा यांनी सांगितले की, बडनेरा मतदारसंघाचा गत १० वर्षांत झालेला विकास हा अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. अतिदुर्लक्षित भातकुली परिसरात झालेली विविध विकासकामे ही ग्रामीण जनतेला विश्वास देत आहेत. लोकसभेत पहिल्याच अधिवेशनात श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींना मिळणाऱ्या तोकड्या ६०० रुपयांऐवजी १२०० रुपये अनुदान करण्यास केंद्र सरकारला भाग पाडले. आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लोकसभेत अंध, विधवा, परितक्त्या, निराश्रित, निराधारांचे प्रश्न मांडले नाहीत. मात्र, ज्या गरीब, सामान्य मतदारांच्या भरवशावर मी लोकसभेत खासदार म्हणून गेले, त्यांच्या हक्काचे प्रश्न, समस्या मांडणे हे माझे कर्तव्य असून, ते मी प्रामाणिकपणे पूर्ण केले, असा ठाम विश्वास खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला. भातकुली तालुक्यात पेढी प्रकल्पग्रस्तांना वाढीव अनुदान, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी पुढाकार, शेतीमालाला दीडपट हमीभाव आदी पायाभूत प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही खासदार राणा यांनी दिली.भातकु ली विकासाचे मॉडेल ठरलेभातकुलीत नव्याने पोलीस ठाणे, न्यायालय इमारत, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, क्रीडा संकुल, पठाण चौक ते ऋणमोचनपर्यंत १० कोटींतून विकास, रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण व चौपदरीकरण, जैन मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी ५० लाख रुपये, मुबलक पाणी सुविधा, ग्रामीण भागात रस्ते, पथदिव्यांची निर्मिती, व्यायामशाळा, समाजमंदिर, सांस्कृतिक भवन, वाचनालय आदी विकासकामे केल्याचा मनस्वी आनंद आहे. भातकुली विकासाचे मॉडेल ठरले आहे, असे रवि राणा म्हणाले.

टॅग्स :badnera-acबडनेरा