शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Maharashtra Election 2019 ; किरकोळ चूकही घडता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

आयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात यावी तसेच सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवावे.

ठळक मुद्देचंद्रकुमार यांचे सर्व यंत्रणांना निर्देश : निवडणूक प्रक्रियेत जबाबदारी अचूकपणे पार पाडा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया ही स्थानिक संदर्भांमुळे अधिक संवेदनशील असते. त्यामुळे मतदान केंद्राध्यक्षांसह प्रक्रियेतील सर्व अधिकऱ्यांंनी नियमांचे काटेकोर पालन करावे. किरकोळ चूकही घडता कामा नये, अन्यथा निवडणूक याचिका दाखल होण्याचे प्रसंग उद्भवतात. प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारीे दिले.निवडणूक आयोगाच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विभागातील निवडणूक कामांचा आढावा घेतला. त्यावेळी चंद्रभूषण कुमार यांच्यासह अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, कायदा व सुव्यवस्था राज्य नोडल ऑफिसर मिलिंद भारंबे, विशेष खर्च निरीक्षक बी. मुरली कुमार तसेच विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरूपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत चूक आढळल्यास चौकशी प्रक्रिया, दंडाची तरतूद आहे, याची जाणीव सर्व कर्मचाऱ्यांना हवी. त्यामुळे अधिक सुस्पष्ट, अचूक व पारदर्शक काम करावे. मतदान, स्वीप, कायदा व सुव्यवस्था, केलेल्या व करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडून कुमार यांनी आढावा घेतला.अतिरिक्त कुमक तयार असावीआयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात यावी तसेच सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवावे. मतदारांना मतदान पावती घरपोच मिळेल या दृष्टीने अगोदरच नियोजन करून त्या पोहोचत्या कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.मतदारांना सुविधा उपलब्ध करासेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्रांवरील इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक स्तरावर भरावयाची विवरणपत्रे, मॉक पोल, मतदानाची वेळ संपल्यावर करावयाची कार्यवाही आदीसंदर्भात पूर्णपणे माहिती द्यावी. सर्व शासकीय यंत्रणांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व सुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात. अधिकाधिक मतदानासाठी प्रत्येक यंत्रणेने जनजागृतीवर भर द्यावा. मतदानाच्या काळात अधिक सजग असावे, असेही कुमार यांनी सांगितले.चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवामतदान केंद्रावर कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज राहावे. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलीस प्रशासनाने स्थापन केलेल्या पथकांकडून तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. मतदारांना प्रलोभन किंवा रोख रकमेचे वितरण आदी प्रकारांना आळा घालावा. प्रत्येक चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवून तपासणी करावी. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची दक्षता घेऊन कठोर कारवाई करावी, असे कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी भारंबे म्हणाले.

टॅग्स :amravati-acअमरावती