शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; कमी टक्केवारीचे चिंतन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात किमान ७५ टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : मतमोजणी केंद्रावर नाही लागणार जामर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार मतदानाचा टक्कावाढीसाठी शासन, प्रशासन स्तरावर जोरकस प्रयत्न झाले. वास्तविकत: अमरावती जिल्ह्यात ६०.५७ टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचे प्रशासन स्तरावर चिंतन केले जाईल. काय उणिवा राहिल्यात, याबाबत योग्य ती दिशा ठरविली जाईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात किमान ७५ टक्के मतदान होईल, अशी अपेक्षा होती. तथापि, आठही मतदारसंघांत केवळ जिल्ह्याची टक्केवारी ६०.५७ एवढ्यावर थांबली आहे. मतदानाची कमी टक्केवारी ही प्रगल्भ लोकशाहीसाठी मारक ठरणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त के ले. विशेषत: अमरावती मतदारसंघात ४९.४३ तर, बडनेरा मतदारसंघात ५२.०७ एवढी मतदानाची टक्केवारी ही चिंतनीय आहे.या दोन्ही मतदारसंघांत थोडेफार ग्रामीण भाग असून, बहुतांश शहरी भाग असल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल, असे निवडणुकीअगोदरचे चित्र होते. मात्र, शहरी भागात मतदारांनी मतदानाकडे का पाठ दाखविली, याचे प्रशासन स्तरावर चिंतन केले जाणार असल्याची ग्वाही जिल्हा निवडणूक अधिकारी नवाल यांनी सांगितले. शाळांमधून विद्यार्थ्यांच्या पाल्यांकडून मतदान करण्याविषयी प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले. मतदार जनजागृतीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. असे असताना मतदानाची कमी टक्केवारी ही प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. परिणामी मतदानाच्या कमी टक्केवारीबाबत प्रशासन स्तरावर मंथन केले जाईल. मतदानाच्या वाढीव टक्केवारीसाठी भविष्यात कोणत्या उपाययोजना करता येतील, या दिशेने प्रयत्न केले जाईल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केला.मतमोजणीसाठी यंत्रणा सज्जकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मतमोजणी केंद्रावर जामर बसविण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे तसे कोणतेही आदेश नाहीत. अमरावती जिल्ह्यात आठही मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांवर जामर लागणार नाही, ही बाब जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केली आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने कडेकोट सुरक्षा असणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे नवाल यांनी सांगितले.

टॅग्स :amravati-acअमरावती