शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; निवडणुकीचा ‘फिव्हर’ वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसेतसे पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उमेदवारांचे विविध घटकही प्रचारात सहभागी होत आहेत. यामध्ये महिला मंडळ, बचत गट, युवक मंडळ, किरकोळ व्यावसायिक व अन्य मंडळी आपापल्या उमेदवारांंना पाठिंबा देऊन प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. यामुळे प्रचार कार्यालयातही गर्दी वाढत असल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.

अमरावती : दसरा सण आटोपताच जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत प्रचाराने वेग घेतला आहे. निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार जोरकस प्रचाराला लागले आहेत. उमेदवारी न मिळालेले अनेकजण समर्थक उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. यामुळे आठही मतदारसंघांत निवडणूक ज्वर तापला आहे. विजयादशमीनंतर खऱ्या अर्थाने राजकारणाचे रण पेटले असून, परस्परांवर टीका, आक्षेप नोंदविले जात आहेत. कुणी विकासकामांचा पाढा वाचत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, तर पाटी कोरी असलेले उमेदवार आश्वासनांची खैरात वाटत आहेत. यंदा आमदारकी मिळवायचीच, या ईर्ष्येने पेटलेल्या उमेदवारांनी सर्वस्व पणाला लावले आहे.सोशल मीडियावर प्रचाराचे अपडेटविधानसभा निवडणुकीत उमेदवारांचे कार्यकर्ते सोशल मीडियावरही प्रचारपत्रकाबरोबर प्रचारातील अपडेट फोटो व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक अशा समाज माध्यमांवर टाकून एकाच वेळी अनेक मतदारांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करीत आहेत. हायटेक प्रचार यंत्रणेवर उमेदवारांसह कार्यकर्तेही पसंती देत आहेत.कुटुंबही प्रचारातप्रचारकार्यात उमेदवारांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीय, विविध संस्थांचा कर्मचारी वर्गही सक्रिय झाला आहे. मतदार याद्यांची गावनिहाय जबाबदारी त्यांच्यावर निश्चित केली आहे. घरोघरी जाऊन मतदारांची प्रत्यक्ष भेट व प्रचारावर प्रत्येकाचा भर आहे.अनेकांचा प्रचारात सहभागविधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसेतसे पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी उमेदवारांचे विविध घटकही प्रचारात सहभागी होत आहेत. यामध्ये महिला मंडळ, बचत गट, युवक मंडळ, किरकोळ व्यावसायिक व अन्य मंडळी आपापल्या उमेदवारांंना पाठिंबा देऊन प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. यामुळे प्रचार कार्यालयातही गर्दी वाढत असल्याचे चित्र मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.मतदार याद्यांचे अवलोकनमतदारसंघात येणाऱ्या गावांची नावे नक्की केल्यानंतर मतदार यादीची पडताळणी व त्यानंतर कुणाची नावे आहेत, कुणाची नाहीत, याचा शोध उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात जबाबदार पदाधिकारी घेत आहेत. त्यानुसार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले जात आहे. विशेष म्हणजे, एकगठ्ठा मते विविध प्रकारच्या माध्यमातून आपल्याकडे वळविण्यासाठी उमेदवारांनी पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न चालविले आहेत. याकरिता निकटवर्तीयांचीही मदत उमेदवाराकडून घेतली जात असल्याचे चित्र विविध मतदारसंघांमध्ये दिसून येत आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती