शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Maharashtra Election 2019 ; दर्यापूर मतदारसंघाचा बदलविणार चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

मी पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची कार्यकर्ती बनली. राजकारणाला समाजकारणाची जोड देण्याच्या त्यांच्या धोरणाची भुरळ मलाच नव्हे तर त्यावेळच्या जवळपास सर्वच तरुण वर्गाला पडली होती. पक्षाचे इमानेइतबारे काम केले. युती तुटल्यानंतर भाजपकडून लढले आणि आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समितीची अध्यक्ष झाले. अनुसूचित जातीतील पहिली अध्यक्ष होण्याचा बहुमान मला मिळाला.

ठळक मुद्देविशेष मुलाखत

सीमा सावळेअमरावती : माझा जन्म दर्यापूरचा. मामाकडे लहानाची मोठी झाले. रत्नाबाई राठी विद्यालयात शिकले. परिस्थिती बिकट होती. तेव्हा गाडगेबाबा वसतिगृहात राहिले. वडील रेल्वेत नोकरीला असल्याने पुढील शिक्षण बडनेरा येथे झाले. पुढील वैवाहिक जीवन, राजकारण व समाजकारणाची वाटचाल पुण्याला झाली. अमरावती जिल्ह्यात जिजाई प्रतिष्ठानमार्फत महिलांनी राखी निर्मिती व अनेक लघु गृहव्यवसाय सुरू करून दिले. रोजगार दिला. लघुउद्योगाून निर्माण राख्यांची विक्री कोटींच्या आकड्यात झाली. त्यापोटी आलेला नफासुद्धा महिलांना मिळाला. शाश्वत रोजगाराचे एक मॉडेल लोकांनी बघितले. मला विधीमंडळात पाठविल्यास रोजगाराची अशी अनेक दालने खुलतील.असा दावा सीमा सावळे यांनी केला.मी पंचवीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची कार्यकर्ती बनली. राजकारणाला समाजकारणाची जोड देण्याच्या त्यांच्या धोरणाची भुरळ मलाच नव्हे तर त्यावेळच्या जवळपास सर्वच तरुण वर्गाला पडली होती. पक्षाचे इमानेइतबारे काम केले. युती तुटल्यानंतर भाजपकडून लढले आणि आशिया खंडातील प्रथम क्रमांकाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेत स्थायी समितीची अध्यक्ष झाले. अनुसूचित जातीतील पहिली अध्यक्ष होण्याचा बहुमान मला मिळाला. या प्रवासात समाजकारणाची धरलेली कास सोडलेली नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.प्रश्न: राजकारणात तुम्ही कशाला प्राधान्य देता?मी पंचवीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. तथापि, राजकारणापेक्षा समाजकारणाला, विकासकार्यालाच मी महत्त्व देत आले. एक लोकसेवक म्हणून, पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणूनच कायम जमिनीवर राहून काम केले. जनतेच्या सुविधांच्या प्रश्नांबाबत विरोधकांशी दोन हात करण्याचीसुद्धा तयारी ठेवली.जीवन जगताना राजकारण असो व समाजकारण, जातीला महत्त्व मी कधीच दिले नाही. कामकाज करताना याबाबत विचारदेखील केला नाही. सर्वांचा विकास करण्याची संधी मिळाल्याच तिचे सोने करावे, हेच ध्येय मी बाळगले आहे.प्रश्न : पिंपरी चिंचवड येथील कामाचा अनुभव दर्यापूर साठी कितपत उपयोग मिळेल?उत्तर : पंचवीस वर्षे लोकसेवक म्हणून कामकाज करताना कायम स्मरणात राहू अशा पद्धतीने सुनियोजित विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. प्रधानमंत्री आवास योजनेतून पाच हजार घरकुले, मेट्रो रेल्वेची उभारणीसुद्धा माझ्या प्रयत्नांनीच झाली. पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटी व वर्षाचे तीन हजार पाचशे कोटी रुपयांचे बजेट पाच हजार कोटीपर्यंत नेण्याचे नियोजन मी करू शकले. त्यात यशही मिळवून दाखविले. महिलांसाठी बसच्या व्यवस्थेसह शहरालगतची गावे शहराला जोडण्याची व त्यांना आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्याची प्रमुख कामे केलीत. आता दर्यापूर मतदार संघातसुद्धा ‘व्हिजन २०२४’ तयार आहे. यात बंद पडलेले उद्योग सुरू करणे आणि नवीन उद्योग उभारून रोजगार निर्मिती करण्यावर भर राहील. विशेष म्हणजे, महिलांसाठी गृहउद्योगावर भर देऊन महिला सक्षमीकरण करणे, गाव तेथे रस्ता व शेतीत पोहचविणारे पांदण रस्ते मजबूत करण्यावर भर तसेच आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याकडे आपले प्राधान्य राहणार आहे.प्रश्न: तुमच्या विषयी विरोधकांचा अपप्रचार सुरू आहे असे वाटते का?उत्तर : माझी उमेदवारी स्पर्धकांच्या जिव्हारी लागली आहे. मी महिला असल्याने माझ्याविषयी अपप्रचार करीत आहेत. परंतु, आपल्या अमरावती जिल्ह्यात कर्तृत्वान महिलांची राजकारण, समाजकारणात अत्युच्च फळी उभी झाल्याचे विरोधक विसरतात. नारीशक्तीचा अपमान जिल्हा सहन करीत नाही, हे वारंवार दिसून आले आहे. आता मी दर्यापूर मतदारसंघात उमेदवारी दाखल करताच माझ्यावरसुद्धा आरोप करण्यात आलेत. महिलाशक्तीला हे आव्हान आहे. २१ तारखेला येथील महिलांच्या शक्तीचा परिचय येईलच, असा मला विश्वास आहे.हजारो कोटींचे बजेट हाताळले : आता मातृभूमिच्या विकासाची ओढ। लोकमत न्यूज नेटवर्कआशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका असा बहुमान ज्या पिंपरी चिंचवड महापालिकेला मिळाला आहे, त्या महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान विकासावर प्रेम करणाऱ्या तेथील जनतेने मला देऊ केला. अनुसूचित जातीतील मी पहिली अध्यक्ष ठरली. ३५०० कोटी रुपयांचे बजेट ५००० कोटी रुपयांपर्यंत मी नेऊ शकले. पिंपरी चिंचवडमध्ये विकासाचा अध्याय आम्ही घडवू शकलो. तोच विकास मला दर्यापूर मतदारसंघात साधावयाचा आहे. येथील नागरिंकानंीही मझ्यावर प्रेम केले. त्यांच्या मायेचे पांग मातृभूमीच्या विकासातून फेडावयाचे आहे. दर्यापूर मतदारसंघातील सामान्यजनांना प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठी झटायचे आहे. महिलांना आत्मसन्मानाने उभे राहता यावे, यासाठी घराघरात प्रत्येक महिलेला गृहउद्योगातून रोजगार द्यावयाचा आहे. माझ्याकडे त्यासाठीचा संपूर्ण आराखडा तयार आहे.विकासाचा आराखडा तयारपिंपरी चिंचवडप्रमाणे दर्यापूर, अंजनगाव या दोन्ही तालुक्याला आकार द्यायचा आहे. गृहपयोगी वस्तुंची निर्मिती, त्यातून रोजगाराच्या विपुल संधी, यावर आपला भर आहे. दर्यापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे व्हिजन तयार आहे. मतदारांनी संधी द्यावी, चेहरामोहरा पालटवून दाखविण्याची ताकद आहे. - सीमा सावळे

टॅग्स :amravati-acअमरावती