शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

Maharashtra Election 2019 ; प्रचार थांबला, ‘पोलिंग पार्टी’ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दुर्गम भाग असलेल्या मेळघाट मतदारसंघात शनिवारी ३५३ मतदान पार्ट्या रवाना झाल्या. आता रविवारी उर्वरित ...

ठळक मुद्देआठ विधानसभा मतदारसंघ : १६ हजार मनुष्यबळावर निवडणुकीचा डोलारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुर्गम भाग असलेल्या मेळघाट मतदारसंघात शनिवारी ३५३ मतदान पार्ट्या रवाना झाल्या. आता रविवारी उर्वरित सात मतदारसंघांमध्ये २२७५ पार्ट्या रवाना होणार आहेत. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ६ नंतर जाहीर प्रचार बंद झाला. आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.मेळघाटात शॅडो एरियातील १३३ मतदान केंद्रे आहेत. यापैकी ४१ केंद्रांवर कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. या ठिकाणी वायरलेसच्या मदतीने संपर्क होणार आहे. यामध्ये २५ मतदान केंद्रांमध्ये बॅटरीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये २६२८ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये २१ साहाय्यकारी केंद्रांचा समावेश आहे तसेच १७५० केंद्र शहरी भागात, तर ८७८ केंद्रे ही ग्रामीण भागात आहेत. या ठिकाणी मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण ९२६५ दिव्यांग मतदार आहेत. त्यांना मतदानासाठी एक सेवक राहणार आहे. त्यांच्यासाठी रॅम्पची सुविधा तसेच १८०० व्हीलचेअर मतदान केंद्रांवर राहणार आहेत. ९६ टक्के मतदारांपर्यंत फोटो व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आलेले आहे. यावेळी ११ आदर्श केंदे्र, १० सखी व दोन दिव्यांग कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रे राहणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.निवडणुकीसाठी एकूण १६ हजार अधिकारी व कर्मचाºयांचे मनुष्यबळ राहणार आहे. यामध्ये २८८९ मतदान केंद्राध्यक्ष व त्यांच्या सहकार्याला प्रत्येकी तीन मतदान अधिकारी तसेच ५४४८ पोलीस पाटील व कोतवाल असे एकूण १५ हजार ९६० कर्मचाºयांचा ताफा राहणार आहे.ग्रामीणमध्ये ४८५८ पोलीसअधिकारी-कर्मचाºयांचा ‘वॉच’संपूर्ण अमरावती मतदारसंघ व बडनेरातील चार बूथ वगळता जिल्हा ग्रामीणमध्ये २८५३ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची करडी नजर राहणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक आयजी, एसपी व अ‍ॅडिशनल एसपी, ७ डीवायएसपी, १३ पीआय, १३० एपीआय/पीएसआय, २०३० पोलीस कर्मचारी, १२२७ होमगार्ड यामध्ये ४०० मध्य प्रदेशातील, सीआरपीएफ ५ कंपनी यामध्ये प्रतिकंपनी ५०० जवानांचा समावेश राहणार आहे. पोलिसांच्या दृष्टीने ग्रामीण कार्यक्षेत्रात १०२ संवेदनशील मतदार केंदे्र, पाच क्रिटिकल मिळून १८९४ बूथ राहणार आहेत. याबाबतचा अंतिम आराखडा आयोगाला पाठविण्यात आलेला आहे.‘अमरावतीकर,चल मतदान कर’मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी वेगवेगळ्या संकल्पनांद्वारे जागृती करण्यात येत आहे. ‘माझे मतदान, माझा अभिमान’ तसेच ‘अमरावतीकर, चल मतदान कर’ या घोषवाक्यांद्वारे शहरासह जिल्ह्यात जागृती होत आहे. त्याचप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत पर्यावरणस्रेही नियोजन आहे. यामध्ये प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.‘त्या’ कार्यकर्त्यांनामतदारसंघ सोडण्याचे आदेशउमेदवाराच्या प्रचारार्थ मतदारसंघाबाहेरील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी डेरेदाखल आहेत. ते सर्व या मतदारसंघाचे मतदार नाहीत. प्रचार कालावधी संपल्यानंतर या व्यक्तींच्या निरंतर उपस्थितीमुळे मुक्त वातावरणातील मतदानाची प्रक्रिया धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे प्रचाराचा कालावधी संपताच संबंधित मतदारसंघ सोडण्याचे आदेश देण्यात आले. या व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणाची पाहणी करून याबाबतचा अहवाल पोलिसांना निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे सादर करावा लागणार आहे.एका उमेदवारालातीन वाहनांची परवानगीमतदानाच्या दिवशी एका उमेदवाराला तीन वाहने वापरण्यास परवानगी राहणार आहे. यामध्ये उमेदवाराला स्वत:, दुसरे त्याच्या प्रतिनिधीला व तिसरे त्याच्या कार्यकर्त्यांसाठी राहणार आहे. उमेदवार जर अनुपस्थित असेल, तर त्याचे वाहन दुसºयाला वापरता येणार नाही. कोणत्याही नेत्यास अन्य वाहन वापरण्याची परवानगी राहणार नाही. वाहनाला असलेली परवानगी वाहनाच्या डाव्या बाजूच्या काचेला चिकटावी लागणार आहे. या वाहनातून मतदारांची वाहतूक केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ १३३ आणि १२३ (५) अन्वये भ्रष्ट कृती गृहीत धरली जाणार आहे.

टॅग्स :amravati-acअमरावती