शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; गर्दीच्या साक्षीने अनिल बोंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 06:00 IST

अनिल बोंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. राज्याचा कृषिमंत्री म्हणून मतदारसंघाचा चेहरामोहरा पालटविण्यात आपण यशस्वी ठरलो. जी कामे राहिलीत, ती जलदगतीने पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ठळक मुद्देशक्तिप्रदर्शन : बैलबंडीतून काढली रॅली, हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी गुरुवारी मोर्शी उपविभागीय महसूल कार्यालयात प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत मोर्शी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार प्रवीण पोटे, माजी खासदार अनंत गुढे, डॉ. वसुधा बोंडे यांची उपस्थिती होती. सजविलेल्या बैलगाडीत बसून अनिल बोंडे यांनी मोर्शीकरांना अभिवादन केले. यावेळी त्यांच्या रॅलीत सुमारे ३० ते ४० हजार कार्यकर्ते, मोर्शीकर प्रचंड उत्साहात सहभागी झाले.अनिल बोंडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. राज्याचा कृषिमंत्री म्हणून मतदारसंघाचा चेहरामोहरा पालटविण्यात आपण यशस्वी ठरलो. जी कामे राहिलीत, ती जलदगतीने पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी भाजपसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्शी, वरूड व शेंदूरजनाघाट या तिन्ही पालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, भाजप संघटनेतील पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.तत्पूर्वी, रामजीबाबा मंदिरापासून रॅलीला सुरुवात झाली. सजविलेल्या बैलगाडीतून अनिल बोंडे यांनी मतदारांना अभिवादन केले. याप्रसंगी तुम्हा सर्वांच्या सहकार्याने विजयाची हॅट्ट्रिक साधणार, असा आशावाद मतदारांना संबोधित करताना अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. गुजरी बाजार, मंत्री मार्केट मार्गे ही रॅली तहसील कार्यालयात पोहोचली. यावेळी मोर्शीचे रस्ते भगव्या गर्दीने फुलून गेले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोंडे यांनी शिवाजी शाळेच्या बाजूच्या प्रांगणात मतदारांशी संवाद साधला.

टॅग्स :morshi-acमोर्शी