४२ घरांत पावसाचे पाणी : सावळी दातुरा ग्रामपंचायतीचे दुर्लक्षपरतवाडा : शहराला लागून असलेल्या सावळी दातुरा ग्रामपंचायतीमधील मधूर कॉलनीतील ४२ घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष उफाळून आला आहे. पावसाचे घाण पाणी विहिरी आणि बोअरवेलमध्ये शिरल्याने नागरिकांना दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. मंगळवारी रात्री परतवाडा व परिसरात मूसळधार पाऊस झाल्याने सावळी दातुरा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या मधूर कॉलनीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. बालाजीनगर व शहरातील काही भागातून उताराचे पाणी नालीतून वाहते. मात्र, संततधार पावसामुळे नाली तोकडी पडल्याने पावसाचे पाणी मधूर कॉलनीत शिरले. मेळघाट मतदारसंघात येणाऱ्या सावळी दातुरा ग्रामपंचायतीचा परिसर परतवाडा शहरातील देवमाळी ग्रामपंचायतीला लागून आहे. परंतु प्रत्यक्षात ग्रामपंचायत पाच किलोमीटर अंतरावर अंजनगाव सुर्जी रस्त्यावर सावळी दातुरा गवात आहे. सावळी दातुरा परिसरात दहा वर्षात ले-आऊट करून प्लॉट टाकण्यात आले. जवळपास सर्वच नोकरदारांची घरे कॉलनी परिसरात आहे. सावळी दातुरा ग्रामपचायत सर्वच कराची वसुली करीत असली तरी सुविधा मात्र शून्य आहे. त्याचाच फटका मंगळवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे बुधवारी संपूर्ण परिसर जलमय झाला होता. नागरिकांना प्रचंड अडचण सोसावी लागली.
मधूर कॉलनी जलमय
By admin | Updated: July 28, 2016 00:17 IST