जलसंचयाऐवजी वाढली काटेरी झुडुपे : सिंचनापासून शेतकरी वंचितत्रिनयन मालपे लोणीआलोडा शिवारात ऋषिबाबा लघुसिंचन प्रकल्पाचे काम गत १४ वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे प्रकल्प तहानलेलाच आहे. या सिंचन प्रकल्पाचे काम केव्हा पूर्णत्वास जाईल व शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ कधी मिळेल, असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ दफ्तरदिरंगाई आणि ठेकेदाराच्या लेटलतिफपणामुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे.महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने सन २००२ मध्ये लोणीनजीक आलोडा शिवारात लोणीलघु पाटबंधारे योजना (ऋषिबाबा प्रकल्प) च्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. याकरिता ३ कोटी २५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. ऋषिबाबा लघु सिंचन प्रकल्पामुळे लोणी आणि परिसरातील शेतीकरिता पूरक ठरणारा आहे. याकरिता ६४ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्राकरिता अधिग्रहीत करण्यात आली. या जमिनीच्या ८० टक्के शेतमालकांना २००४ मध्ये अनेकवेळा पाठपुरावा केल्याने शासनाने निर्णयानुसार मोबदला दिला. मात्र २० टक्के शेतकरी प्रकल्पग्रसांना अद्यापही मदत मिळाली नाही. वाढीव मोबदलासुध्दा बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना मिळाला नाही. या प्रकल्पाची महत्तम उंची ९१.७० मीटर असून भिंतीची लांबी एक हजार ४५० मीटर आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाझराचासुध्दा लाभ मिळणार आहे. यातून काढण्यात येणाऱ्या कालव्यामुळे लाभ क्षेत्रातील हजारो हेक्टर जमिनीला लाभ होणार आहे. हा प्रकल्प फायदेशिर असल्याने वरुड मोर्शीचे तत्कालीन आमदार नरेशचंद्र ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे व नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाने मंजूर केला होता. या प्रकल्पासून शेकडो हेक्टर जमिनीच्या सिंचनाकरिता लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केले. या प्रकल्पाला पाणी कमी पडू नये म्हणून भविष्यातील नियोजन केले होते. यामध्ये वर्धा डायव्हर्शन सुपर एक्स्प्रेस कालव्यामधून बेनोडा येथील धवलगीरी नदीमध्य ेसोडून ते धवलगीरी नदीतून या प्रकल्पात सोडण्याचा बेत होता. परंतु सत्तांतरे झाल्याने येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी ते पूर्ण करण्याकरिता पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न केले नाहीत तर गत पाच वर्षांपासून तालूक्यातील अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. यामुळे प्रकल्पाच्या किमतीमध्ये चौपट वाढ झाली. मात्र शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ अद्यापही मिळाला नाही. ऋषिबाबा प्रकल्पाचे कार्य गत १४ वर्षांपासून सुरू असून निधीअभावी थंडबस्त्यात आहे. आव्हरफ्लो आणि गेटचे काम शिल्लक आहे. परंतु येथे ेजलसंचयाऐवजी आता कोअरी झुडुपांनी जागा घेतली. ओव्हरफ्लो आणि भिंतीवर झाडेझुडुपे वाढल्याने त्याचीसुध्दा पतवारी घसरली आहे. त्यामुळे कालव्याची दुर्दशा झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा शासनाचा या प्रकल्पावर खर्च होऊनही अपूर्ण अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ कधी मिळणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे.
लोणीचा ऋषिबाबा प्रकल्प १४ वर्षांपासून तहानलेलाच
By admin | Updated: December 16, 2015 00:23 IST