शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१७ जुलै रोजी खंडग्रास चंद्रग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:51 IST

पुढील आठवड्यात बुधवार, १६ जुलै रोजी रात्री १.३२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग आहे. ग्रहणास सुरुवात होऊन ३.०१ वाजता ग्रहण मध्य व ४.३० वाजता ग्रहणमोक्ष होणार आहे.

ठळक मुद्देमराठी विज्ञान परिषदेची माहितीआकाश निरभ्र असल्यास निरीक्षण शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुढील आठवड्यात बुधवार, १६ जुलै रोजी रात्री १.३२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग आहे. ग्रहणास सुरुवात होऊन ३.०१ वाजता ग्रहण मध्य व ४.३० वाजता ग्रहणमोक्ष होणार आहे. एकूण २.५८ मिनिटांचा ग्रहण कालावधी राहणार असून, ही एक खगोलीय घटना आहे. आकाश निरभ्र असल्यास अवलोकता येणार असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेने दिली.अवकाशात पृथ्वी चंद्राभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. त्यामुळे पृथ्वी, सूर्य व चंद्र कधीतरी एका रेषेत येतात. त्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीची सावली नेहमीच पडते. परंतु इतर वेळी ती अवकाशात पडत असल्याने दिसत नाही. परंतु चंद्र जेव्हा सरळ रेषेत येतो तेव्हा चंद्राची पार्श्वभूमी मिळाल्याने पृथ्वीची सावली आपल्याला चंद्रावर दिसून येते. चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होत असते. परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. याचे कारण म्हणजे चंद्र व पृथ्वी सरळ रेषेत नसतात. चंद्रावर पृथ्वीची सावली पडल्याने वातावरण कोणत्याही प्रकारे दूषित होत नाही किंवा मानवी जीवनावर त्याचा कोणताही शुभाशूभ परिणाम होत नाही. हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. यावेळी हे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतासह मध्य आशिया, आफ्रिका, युरोप व अरबी समुद्रातून दिसणार आहे. आपण ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाची सावली पाहण्याचा योग चंद्रग्रहणात येतो.चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. हे पाहण्यासाठी कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. सर्व गैरसमज झुगारून नागरिकांनी आकाश निरभ्र असल्यास आस्वाद घ्यावा- रवींद्र खराबे,खगोलशास्त्र शाखा प्रमुख, मविप, अमरावती

टॅग्स :scienceविज्ञान