शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पोहरा जंगल बनले प्रेमीयुगुलांचे आश्रयस्थान

By admin | Updated: September 4, 2014 23:28 IST

शहरातील वर्दळीपासून लांब जाऊन एकांत शोधणाऱ्या प्रेमीयुगुलांसाठी पोहरा जंगल हे आवडीचे ठिकाण बनले आहे. येथील शांत, एकांत निसर्गरम्यस्थळी अनेक जोडपी बसलेली आढळतात. अमरावती-चांदूररेल्वे मार्गावर

अमोल कोहळे - पोहराबंदीशहरातील वर्दळीपासून लांब जाऊन एकांत शोधणाऱ्या प्रेमीयुगुलांसाठी पोहरा जंगल हे आवडीचे ठिकाण बनले आहे. येथील शांत, एकांत निसर्गरम्यस्थळी अनेक जोडपी बसलेली आढळतात. अमरावती-चांदूररेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांपासून प्रेमीयुगुलांचा हैदोस सुरू आहे. पोहरा जंगलात सर्वत्र हिरवळ असल्याने प्रेमीयुगुल या परिसरात आश्रयाला येत आहेत. पोहरा हे जंगल अतिशय घनदाट असून निसर्गाच्या कुशीत वसलेला हा परिसर पावसाळ्यात हिरवाईने नटतो. येथील नैसर्गिक वातावरण प्रफुल्लीत करते. अमरावतीहून निघाल्यानंतर थोडे अंतर पार केले की निसर्गाची किमया जाणवायला लागत असल्याने अश्लील चाळे करण्यासाठी येथे युवक-युवतींची सतत वर्दळ दिसून येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी या मार्गावरुन ये-जा करतात. पोहरा, चिरोडी, मानखेडा, सावंगा, गोविंदपूर, बोडणा, पिपळखुटा, चांदूरेल्वे या ठिकाणी कार्यरत शिक्षक व कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. परंतु तोंडाला दुपट्टा बांधून असणारे युवक-युवती कुणाचीही तमा न बाळगता रस्त्यावरच अश्लील चाळे करतात. अमरावती येथील प्रेमीयुगुल झाडाचा आडोसा घेऊन जंगलात नको त्या अवस्थेत दृष्टीस पडतात. महाविद्यालयात शिकायला जाण्याचे कारण सांगून घराबाहेर पडणाऱ्या युवतींना टवाळखोर हेरतात व आपल्या प्रेम जाळ्यात अडकवितात. एकदा प्रेमसूत जुळले की युवतींना फिरायला जाण्याचे आमिष दाखवून या जंगलाकडे आणले जाते. अमरावतीपासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावरुन हे जंगल सुरू होते. झाडा-झुडपाच्या आडोशाला प्रेमीयुगुलांचे जोडपे, निवांतपणे गप्पा मारताना आढळून येत आहेत. दररोज पन्नास ते शंभर पे्रमीयुगुल या मार्गाने ये-जा करतात. याकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. या प्रकाराकडे शहरातील पालकवर्गाने जातीने लक्ष घालण्याची गरज आज निर्माण झाली आहे. प्रमीयुगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.