शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
3
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
4
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
5
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
6
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
7
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
8
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
9
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
11
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
12
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
13
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
15
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
16
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
17
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
19
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
20
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या

ज्यूस विक्रेत्यांच्या गाड्यांवर प्रेमीयुगुलांचा वावर

By admin | Updated: March 2, 2017 00:01 IST

अंबानगरीत अनेक परप्रांतीय शितपेय आणि ज्यूस विक्रेते उन्हाळ्याची चाहुल लागताच डेरेदाखल झाले आहेत.

अमरावती : अंबानगरीत अनेक परप्रांतीय शितपेय आणि ज्यूस विक्रेते उन्हाळ्याची चाहुल लागताच डेरेदाखल झाले आहेत. शहरातील प्रमुख मार्गांवरील फुटपाथवर अनाधिकृत हातगाड्या लाऊन याठिकाणी शितपेयविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. परंतु रात्र होताच या गाड्यांवर प्रेमीयुगुलांचा राबता दिसतो. शहरातील अनेक जोडपी येथे बिनधास्तपणे तासन्तास बसलेली आढळून येतात. अनेक हातगाड्यांवर तर सार्वजनिक ठिकाणी वर्तनाचे ििनय मोडून सर्रास अश्लिल चाळे होत असल्याचे चित्र आता नवीन राहिलेले नाही. त्यामुळे यामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनाच खाली मान घालावी लागते. शहरातील मालटेकडी परिसरात ज्यूस विक्रेत्यांच्या गाड्या दिवसभर उभ्या असतात. शासकीय आयटीआय महाविद्यालय ते श्री शिवाजी महाविद्यालय मार्गावर देखील परप्रांतीय ज्यूस विक्रेत्यांच्या गाड्या दिसून येतात. येथेही असाच प्रकार सर्रास आढळून येतो. शेगाव ते कठोरा नाका मार्गावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयानजीक दहा ते बारा गाड्या उभ्या असतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी फुटपाथ बांधले आहेत. झाडांच्याआड आक्षेपार्ह वर्तन अमरावती : याकरिता कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आलेत. मात्र, परप्रांतीय ज्यूस विक्रेते मात्र सगळे नियम धाब्यावर बसवून फुटपाथवर अतिक्रमण करीत आहेत. येथे वाढत असलेला प्रेमीयुगुलांचा वावर धोकादायक असतानाही त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. फुटपाथवर ज्यूस विक्रेत्यांच्या गाड्यांवर रात्रीच्या दरम्यान सर्रास प्रेमीयुगुलांचा वावर असतो. शेजारी झुडुपे वाढलेली असल्याने त्या आडोशाला मुला-मुलींचे गैरवर्तन सुरू असते. यावर अंकुश लावण्याची मागणी होत आहे. परप्रांतीय ज्यूसविक्रेत्यांच्या ५० पेक्षा अधिक हातगाड्याशहराच्या मुख्य मार्गावर परप्रांतीय ज्यूसविक्रेत्यांच्या ५० पेक्षा जास्त हातगाड्या आहेत. शहरात मागील काही वर्षांपासून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. महाविद्यालयीन तरूण-तरूणींच्या भरवशावरच हा व्यवसाय बहरला आहे. प्रेमीयुगुलांना जागा उपलब्ध करून देण्याच्या बदल्यात हे विक्रेते त्यांच्याकडून ज्यूसचा जादा दर आकारतात. तसेच त्यांचे अश्लिल वर्तनही डोळ्यांआड केले जाते. काय करतात पोलीस ? सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन होत आहे. तरूण-तरूणी ज्यूच्या हातगाड्यांवर बिनधास्तपणे बसून अश्लिल हालचाली करतात. यामुळे इतर नागरिकांची कुचंबणा होते. अशा प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असते. परंतु पोलीस कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे शहर पोलीस करतात तरी काय, हा प्रश्न सभ्य नागरिकांच्यावतीने उपस्थित केला जात आहे.