शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

भररस्त्यांत गावगुुंडांचे मद्यप्राशन !

By admin | Updated: September 26, 2016 00:20 IST

अंबानगरी ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे यानगरीला सुसंस्कारांची देण आहे.

नियम, कायद्याची ऐशीतैशी : पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाढले मवाल्यांचे मनोबल, शांतता-सुव्यवस्था धोक्यातसंदीप मानकर  अमरावतीअंबानगरी ही विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे यानगरीला सुसंस्कारांची देण आहे. ही संताची नगरीसुद्धा मानली जाते. परंतु या नगरीच्या लौैकिकाला गालबोट लावण्याचा प्रकार काही समाजकंटक वरचेवर करीत असतात. अलीकडे काही गुंड तरूणांचे टोळके नियमांची ऐशीतैशी करीत भररस्त्यात सर्वांच्या डोळयांदेखत मद्यप्राशन करतात. हा प्रकार अमरावतीच्या पोलिसांना माहीत असूनही कोणतीच कारवाई का केली जात नाही, हा प्रश्न उपस्थित होतो.येथील व्याघ्र प्रकल्प कार्यालयासमोर क्लासिक कमर्शियल कॉम्प्लेकसमध्ये एक वाईनशॉप आहे. मध्यवस्तीत मवाल्यांचा हैदोसअमरावती : भरवस्तीतील दारूच्या दुकानात सायंकाळी ६ वाजतापासून गुंड प्रवृत्तीचे तरूण एकत्र येतात. या दारू दुकानात मद्यप्राशन करतात. हा सर्व प्रकार प्रतिष्ठित नागरिकांच्या वस्तीलगत घडत असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होते. विशेषत: महिलांची गोची होते. हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या मनावर वाईट परिणाम होतो. एक तर भरवस्तीत दारू दुकानाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी द्यायलाच नको. कारण, परिसरातील रहिवाशांना भयंकर त्रास सोसवा लागतो. याठिकाणी तर अनेक गुंड प्रवृतीचे तरुण एकत्र येऊन दारू विकत घेतात. ‘डिस्पोजल ग्लास’, थंड पाण्याचे पाऊच आणि चकना विकत घेऊन या मार्केटच्या फुटपाथवर उघडयावर दारुची पार्टी करण्यात येते. अनेकदा हे चित्र पाहायला मिळते. एखाद्या नागरिकांने या टोळक्याला याबाबत हटकले असता त्यांनाच अश्लील शिवीगाळ प्रतिष्ठित नागरिकांनी हटकले, तर त्यांनाच अश्लील शिवीगाळ केली जाते. इतकेच नाही तर दारूच्या नशेत हे मवाली तरूण कोणासोबतही भांडण उकरून काढतात. त्यामुळे हा प्रकार असह्य होऊनही शांतताप्रिय नागरिक या टोळक्याच्या वाटेला जात नाहीत. अमरावती पोलिसांनाही हे सगळे उघड्या डोळ्यांनी दिसते. तरीही कोणतीच कारवाई केली जात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जेथे हा प्रकार घडतो, त्याठिकाणी एक डीबी आहे. त्या डीबीवर दारूच्या खाली पाण्याच्या तसेच डिस्ट्रील वॉटरच्या बॉटल ठेवलेल्या दिसून येतात. येथे एक पानटपरी आहे. तेथे हे तरूण थांबलेले असतात. येथे बेधडक धुम्रपानही केले जाते. अवैध गुटखाही विकण्यात येतो. शेजारीच असलेल्या नालीत दारू ढोसून रिकाम्या बाटल्या फेकल्या जातात. त्यामुळे स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.