शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

देवीचा अवतार सांगून लुबाडले

By admin | Updated: March 17, 2016 00:34 IST

घरात लहान मुलासह एकटी असल्याचे पाहुन एका अनोळखी महिलेने देवाचा प्रकोप होण्याची भिती दाखवून घरात प्रवेश केला.

वरठी येथील प्रकरण : सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपासवरठी : घरात लहान मुलासह एकटी असल्याचे पाहुन एका अनोळखी महिलेने देवाचा प्रकोप होण्याची भिती दाखवून घरात प्रवेश केला. मी सांगितल्याप्रमाणे न केल्यास कुंटुबातील सदस्य मरतील, असे सांगून पुजा करण्यासाठी अंगावरचे दागिने व रोख रक्कम असे २० हजार ७०० रुपयांच्या सामानावर हात साफ केल्याचा प्रकार वरठी रेल्वे वसाहतीत उघडकीस आला. मंगळवारला घटनेच्या दिवशी दुपारी १२.३० वाजता दरम्यान राजेशकुमारी मिना (२८) हे १० वर्षीय मुलासोबत घरी होत्या. त्यावेळी पांढरे कपडे धारण करून कपाळावर लाल टीळा लावून एक अनोळखी महिला घरासमोर आली. आपण दगड फोडून माताजीचे अवतार असल्याचे सांगून महिलेच्या मनात धास्ती भरवली. माताजीने तुमच्या घरी पाठवले असून मला पुजा करायची आहे असे सांगितले. मी म्हणतो तसे केले नाही तर तुमचा मुलगा, पतीचा मृत्यू होईल. देवीचा प्रकोप होऊन तुमचे कुंटुब उध्वस्त होईल, असे सांगितले.श्रद्धेमुळे सदर महिलेने पुजा करण्यासाठी तयारी दर्शविली. त्यानुसार त्या अनोळखी महिलेने तांब्याच्या लोट्यात पाणी आणि घरातून पीठ आणायला सांगितले. सदर पीठात पुजा करण्यासाठी अंगावरचे दागिने मागितले. त्यावेळी राजेशकुमारीने विचार न करता कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने व पायातील पायपट्या आणि ७०० रुपये तिच्या स्वाधीन केले. सर्व सामान व पैसे प्लास्टिकच्या पिशवीत टाकून ते पीठात मिसळवून ठेवल्याचे भासवून सदर महिला साहित्य व पैसे घेऊन पसार झाली. दरम्यान दागिने सुरक्षित पीठात आहेत. संध्याकाळी ७ वाजता दोन अगरबत्ती लावून पीठातून दागिणे काढून घेण्यासाठी सागितले होते. त्यावेळी १०० रुपयांची नोट पण मिळणार आणि त्या पैशाचे प्रसाद गावात वाटल्याने सर्व संकटे दूर होणार असल्याचे सांगून सदर महिला पसार झाली. देवीचा अवतार घरी आल्याच्या श्रद्धेत त्या महिलेने कोणतीही चौकशी न करता तिचे एैकले. एवढेच नाही तर त्या महिलेला सोडण्यासाठी बसस्थानकापर्यत गेली. देवीचा अवतार म्हणून मिळालेल्या आदेशानुसार रात्री ७.०० वाजता सदर महिलेने दोन अगरबत्ती लावून घरात ठेवलेल्या पीठातून दागिणे शोधले. परंतु दागिणे काही मिळाले नाही.अनोळखी महिलेकडून लुबाडल्याचे समजताच तिने पोलीसात धाव घेतली. राजेशकुमारी मिना यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ४२० कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद कदम करीत आहेत. (वार्ताहर)