शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरबाजार येथे वीज कंपनीकडून ग्राहकांची लूट

By admin | Updated: October 15, 2014 23:13 IST

विलंब आकाराच्या नावावर महावितरण कंपनीने ग्राहकांची लूट चालविली आहे. भारनियमन तसेच वीज दरवाढीच्या समस्येने आधीच त्रस्त असणाऱ्या ग्राहकांची विलंब आकाराच्या नावावर लूट होत

चांदूरबाजार : विलंब आकाराच्या नावावर महावितरण कंपनीने ग्राहकांची लूट चालविली आहे. भारनियमन तसेच वीज दरवाढीच्या समस्येने आधीच त्रस्त असणाऱ्या ग्राहकांची विलंब आकाराच्या नावावर लूट होत असल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महावितरणच्यावतीने सुरू असलेले भारनियमन त्याचबरोबर वीज वापरासाठी आकारण्यात येणारे वाढते दर व ग्रामीण भागात भारनियमनाव्यतिरिक्त होणारा खंडित विद्युत पुरवठा यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यातच महावितरणच्यावतीने दरमाह वेळेवर देण्यात येणाऱ्या विद्युत बिलावर दिलेल्या रकमेचा भरणा व त्यानंतर विलंब झाल्यावर अधिक रकमेची करावी लागणारी भरणा यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड बसत आहे.विद्युत बिले वेळेच्या आत ग्राहकांना पोहचतील याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. परंतु महावितरण कंपनीच्यावतीने वीज बिले वाटण्याचा ठेका कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आला आहे. सदर ठेकेदाराकडून वेळेवर बिलाचे वाटप ग्राहकांना होत नाही. त्यामुळे उशिराने मिळालेल्या बिलाचा भरणा करताना अतिरिक्त दंडाचा भरणा वीज ग्राहकांना सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या विलंब आकाराच्या नावाने वीज कंपनीकडून अशाप्रकारे वीज ग्राहकांची लूट सुरू आहे. त्यातच विलंब दर आकारणीचा भुर्दंड यामुळे महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विद्युत ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वीज कंपनीकडून होणारी वीज ग्राहकांची लूट थांबवून सुरळीत सेवा देण्याची मागणी वीज ग्राहकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)