शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लाचखोरांनी शोधली 'सुवर्ण भेटी'ची पळवाट

By admin | Updated: December 18, 2014 00:12 IST

या वर्षात अनेक लाचखोरांना रंगेहात पकडल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे.

अमरावती : या वर्षात अनेक लाचखोरांना रंगेहात पकडल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे. शासकीय कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे, अंतर्गत चौकशी यासारख्या माध्यमातून लाचखोरी रोखण्याचे उपाय शासनाने योजिले आहेत. मात्र लाचखोरांनी लाच स्वीकारणे कमी न करता लाच स्वीकारण्याच्या नव्या वाटा शोधल्या आहेत. जसे रोख पैसे न घेता सुवर्ण अलंकार स्वीकारण्याचा नवा फंडा या लाचखोरांनी निवडला आहे. यामध्ये महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा समावेश आहे. शासनाने भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. अनेक अधिकारी कर्मचारी या कारवाईमध्ये पैसे स्वीकारताना रंगेहात पकडले जाते. अलीकडे अशा प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे लाचखोर अधिकारी व कर्मचारी अधिक सावध झाले आहे. त्यांनी आता रोख रक्कम स्वीकारण्याऐवजी परस्पर मोठ्या पेढीतून सुवर्ण अलंकार आणने पसंत केले आहे. ज्याचे काम करावयाचे आहे. त्याला सुवर्ण अलंकाराचे पैसे मागविण्याचे सांगितले जाते. या व्यवहारात कोणत्याही नोंदी किंवा पावती केल्या जात नाही. अशा लाचलुचपत अधिकारी, कर्मचाऱ्याला पकडणे लाचलुचपत खात्यासमोर नवे आव्हान आहे.जिल्ह्यात प्रामुख्याने वाळुमाफिया व अवैध धंद्यामधील व्यक्ती व ओव्हरलोड ट्रकची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीव्दारा एजंटच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सुवर्ण अलंकार भेट देण्याची चर्चा जिल्ह्यात आहे. याचेच अनुकरण अन्य अधिकारी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)