शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

अनधिकृत बांधकामावर नजर

By admin | Updated: June 2, 2017 00:10 IST

महापालिका कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांच्या कालावधीत ३ हजारपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामाच्या मालमत्ता

आयुक्तांचे निर्देश : ९७९४ मालमत्ता नव्याने कराच्या अखत्यारितलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांच्या कालावधीत ३ हजारपेक्षा अधिक अनधिकृत बांधकामाच्या मालमत्ता कराच्या अखत्यारित आणल्याने मनपाच्या तिजोरीत घसघशीत वाढ होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर अनधिकृत बांधकामाच्या मालमत्तांवर लक्ष केंद्रीत करून त्या मालमत्ता कराच्या अखत्यारित आणण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. आयुक्त हेमंत पवार यांनी गुरूवारी यासंदर्भात बैठक घेतली. मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी दिलेल्या सक्त दिशानिर्देशांची पावती म्हणून करवसुली लिपिकांनी दोन महिन्यांत नव्याने ९७९४ मालमत्ता कराच्या अखत्यारित आणल्या आहेत. यातून पालिकेच्या तिजोरीत सुमारे ४.५४ कोटींची वाढ अपेक्षित आहे.३१ मार्चला संपुष्टात आलेल्या आर्थिक वर्षातील मालमत्ताकराच्या घसरलेल्या टक्क्याच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांनी ११ एप्रिलला करवसुली लिपिकांची बैठक घेऊन त्यांना ३ महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता. २७८६ मालमत्तांचे बांधकाम अनधिकृत महापालिकेच्या पाचही प्रशासकीय झोनमध्ये तब्बल २७८६ अनधिकृत बांधकाम असलेल्या मालमत्तांना अधिकचा कर लावण्यात आला आहे.यात झोन १ मधील ५८८ अनधिकृत बांधकामांना ४.८६ लाख रुपये दंड लावण्यात आला आहे. २७८६ अनधिकृत बांधकामातून महापालिकेच्या तिजोरीत ९७ लाख ३८ हजार रुपये जमा होतील.अशी वाढली कराची मागणीअमरावती : यात नव्या मालमत्ता शोधून काढण्यासह ज्या मालमत्तांच्या वापरात बदल झाला, याशिवाय ज्या मालमत्ता अद्यापही कराच्या अख्त्यारित आल्या नाहीत, त्यांना शोधून मागणी वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. मालमत्ताकरावर महापालिकेचा आर्थिक डोलारा असताना करवसुलीतील हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिल्याने ही बैठक प्रचंड वादळी ठरली होती. तीन महिन्यांचा अल्टिमेटम देताना ‘मिशन सक्सेस’न झाल्यास कारवाईचा बडगा उगारण्यासह काहींची कुंडली बाहेर काढण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता. त्यासाठी करवसुली लिपिकांच्या बदल्याही करण्यात आल्या होत्या. प्रसंगी कामचुकार आणि भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना एसीबीमध्ये देण्याची तंबी आयुक्तांनी दिली होती. त्याअनुषंगाने नव्याने मालमत्ता करआकारणीचा आढावा घेण्यात आला. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ३१ मेपर्यंत ९७९४ मालमत्तांचे नव्याने सर्वेक्षण करून ४ कोटी ५४ लाख २७ हजार ५७२ रूपयांची वाढीव मागणी नोंदविली आहे.