शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश प्रक्रियेवर राहणार करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:53 IST

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवर तालुकास्तरीय पथकांची करडी नजर राहणार असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देशिक्षण विभाग : शैक्षणिक सत्र २०१९-२० आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवर तालुकास्तरीय पथकांची करडी नजर राहणार असल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१)सी नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. २०१९-२० यावर्षीच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यात येत आहे. २०१८-१९ या वर्षी नोंदणी झालेल्या आरटीई २५ टक्के पात्र शाळांचे आपोआप रजिस्ट्रेशन व्हावे, यासाठी सर्व शाळांची पडताळणी गटशिक्षणाधिकारी स्तरावरून करण्यात आली, तर पुढील शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्यासाठी नव्याने नोंदणी करणाऱ्या शाळांची नोंदणी पोर्टलवर करण्यात आली.मागील वर्षी नोंदणी झालेल्या आरटीई २५ टक्के प्रवेशप्राप्त शाळांची मागील वषार्ची ‘सरल’ प्रणालीमधील सर्वसाधारण २५ टक्के प्रवर्गातील प्रवेशाची माहिती घेण्यात येऊन, त्या प्रवेशाच्या जास्तीत जास्त २५ टक्के प्रवेश प्रक्रिया २०१९-२० या वर्षाकरिता निश्चित करण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकारी स्तरावरून प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे तपासण्याकरिता पडताळणी समित्या गठित करण्यात आल्या आहेत.महानगरपालिका स्तरावर ही अशीच समिती राहणार आहे. प्रवेशासाठी निवासी पुरावा, जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अशी कागदपत्रे दाखल करावी लागणार आहेत. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत २० सदस्य राहणार आहेत. पडताळणी समितीमधील माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरण्यात आली आहे .प्रवेश नाकारल्यास मागता येणार दादप्रवेशासाठी कागदपत्राच्या पडताळणीसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात खिडकी उघडण्यात येणार आहे. पडताळणी समितीने तपासणी केलेल्या पात्र विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकाºयाची स्वाक्षरी घेऊन शाळेत नेले जाईल. शाळा स्तरावर कोणत्याही कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार नाही. कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागता येणार आहे. अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे.