शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उपनिबंधक कार्यालयावर 'एसीबी’ची करडी नजर

By admin | Updated: September 14, 2015 00:07 IST

येथील उपनिबंधक कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) कडे प्राप्त झाल्या आहेत.

भ्रष्टाचाराच्या तक्रारी : पैशाशिवाय काम होत नसल्याची ओरड अमरावती : येथील उपनिबंधक कार्यालयात भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी) कडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयावर एसीबीचे लक्ष असून काही विशिष्ट अधिकाऱ्यांना ‘ट्रॅप’मध्ये घेरण्याची रणनीती सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उपनिबंधक कार्यालयात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशी अनेकांची ओरड आहे. शेत, भूखंड खरेदी असो वा बँकेचा व्यवहार या सर्व प्रकारासाठी नागरिकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. या कामासाठी मुद्रांक विक्रेत्यांची भूमिका महत्त्वाची राहते. मुद्रांक शुल्क व्यतिरिक्त कामाची टक्केवारी ठरली असून ती दिल्याशिवाय वेळेत कामे होत नाहीत. अन्यथा कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, हे वास्तव आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातही हीच बोंबाबोंब आहे. सहकार खात्याचे सर्वोच्च अधिकारी हे दीर्घ रजेवर असल्यामुळे स्थानिक पातळीवर कोणाचेही नियंत्रण नाही. याचा फायदा घेत काही अधिकारी हे निरंकुश व मनमानी कारभार करीत असल्याच्या तक्रारी ‘एसीबी’कडे पुराव्यानिशी प्राप्त झाल्या आहेत. ‘एसीबी’च्या अधीक्षकांनी उपनिबंधक कार्यालयात सुरु असलेल्या निरंकुश कारभारावर बारकाईने लक्ष ठेवले आहे. ‘एसीबी’ने स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवून उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दैंनदिन कारभाराचा आढावा घेत असल्याची माहिती आहे. ‘एसीबी’मध्ये नव्याने रुजू झालेल्या अधीक्षकांनी प्राप्त तक्रारींची दखल घेणे सुरू केले आहे. तक्रारीत सत्यता पडताळून पाहण्यासाठी ‘एसीबी’ची चमू कामी लावली आहे. तर दुसरीकडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सुरु असलेल्या गलथान कारभाराची तक्रार पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडेसुद्धा देण्यात आली आहे. उपनिबंधक कार्यालयात भ्रष्टाचाराचे जाळे हे खोलवर रुजल्याच्या तक्रारी अनेकांच्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुकांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी टक्केवारी ठरवून एजन्सीच्या माध्यमातून विशेष वृत्तपत्रात जाहिराती देण्याचा प्रताप केला आहे. हा सर्व खर्च सहकारी संस्थावर टाकण्याची शक्कल लढविण्यात आली आहे. उपनिबंधक नोंदणी आणि सहकारी संस्थाच्या कार्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचारावर आळा बसविण्यासाठी ‘एसीबी’ने पुढाकार घेतला असल्याची माहिती आहे.