शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा नील, विधानसभेची उधारी बाकी

By admin | Updated: November 23, 2014 23:11 IST

राज्यभरात मागील एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निवडणूक खर्च प्रशासनाने नील केला. मात्र, त्यानंतर आॅक्टोबरमध्ये झालेली विधानसभा निवडणूक निर्विघ्र पार पडली.

अमरावती : राज्यभरात मागील एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निवडणूक खर्च प्रशासनाने नील केला. मात्र, त्यानंतर आॅक्टोबरमध्ये झालेली विधानसभा निवडणूक निर्विघ्र पार पडली. या निवडणुकीत झालेल्या खर्चापोटी निवडणूक आयोगाने ७ कोटी २२ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ज्यांना पैसे देणे आहे त्याबाबत संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रस्ताव न आल्यामुळे हा निधी पडून आहे. आक्टोबर महिन्यात जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांत निवडणुका घेण्यात आल्यात. यासाठी निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोगाकडून प्रशासनाला निधी उपलब्ध करुन दिला जातो. त्यानुसार निवडणूक आयोगाने सुमारे ७ कोटी २२ लाख रुपये मतदान खर्च म्हणून उपलब्ध करुन दिले होते. त्यापैकी २ कोटी ४३ लाख ८७ हजार रुपयांचा निधी विविध मतदारसंघांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला. यामध्ये मतदान केंद्रावरील तयारी, साहित्यावरील खर्च, मतदान प्रक्रियेत सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मानधन, वाहन, वाहनांचे डिझेल, कार्यालयीन खर्च, टेशनरी, मंडप भाडे, खुर्च्या टेबल, इलेक्ट्रॉनिक साहित्य सामग्री, प्रिंटिंग, झेरॉक्स, व्हिडीओ शुटींग, जेवण, नाश्ता अशा विविध प्रकारच्या कामांसाठी हा निधी यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान आयोगाकडून वेळेवर उपलब्ध होत नव्हता. मात्र लोकसभेच्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने ज्यांची यामध्ये मदत घेतली त्या कंत्राटदार व विविध कामांचा सुमारे ९ कोटी ३६ लाख रुपयांचा सर्व खर्च नील केला आहे. मात्र विधानसभेसाठी वरील साहित्य व यंत्रणांची घेण्यात आलेली मदत, ठेकेदारांची देणी, व्हिडीओ शुटींग व प्रशासकीय झालेल्या खर्चासाठी निवडणूक आयोगाने ७ कोटी २२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. परंतु हा निधी उपलब्ध झाल्यानंतरही संबंधित आठही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून खर्चाबाबतच्या मागणीचे प्रस्तावच आले नसल्याने हा निधी तसाच पडून आहे. मात्र ज्यांना प्रशासनाकडून पैसे घेणे आहेत त्यांना आपल्या पैशासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. (प्रतिनिधी)