शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’शैक्षणिक प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 00:07 IST

बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्यांना आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश देऊन करिअर घडवायचे, ही चिंता सतावत आहे.

श्रीकांत देशपांडे : ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा थाटात शुभारंभलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्यांना आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश देऊन करिअर घडवायचे, ही चिंता सतावत आहे. मात्र, ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित शैक्षणिक प्रदर्शनात मुलांचे नक्कीच भवितव्य घडेल, असे प्रतिपादन अमरावती विभागाचे शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केले.येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात ‘लोकमत’ व द युनिक अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकमत अ‍ॅस्पायर एज्युकेशन फेअर’च्या शुभारंभाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून द युनिक अकादमी पुणे यथील सुरेश साळवे, एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी पुणे येथील भूषण मेहरे, मराठवाडा मित्र मंडळ ग्रुप, पुणे येथील अपर्णा ठाकूर व लोकमतचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे उपस्थित होते. प्रदर्शनीचे उद्घाटन श्रद्धेय बाबुजी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला दीप प्रज्ज्वलन व पूजनाने करण्यात आले.आ. श्रीकांत देशपांडे म्हणाले, "लोकमत"चा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि चांगला आहे. एकाच ठिकाणी राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पाल्यांना मुलांचे भवितव्य घडवायचे असेल तर नक्कीच शैक्षणिक प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी मार्गदर्शनादरम्यान केले.त्यांनी"लोकमत"च्या या उपक्रमाची भरभरून प्रशंसा केली. दहावी, बारावीचा निकाल जाहीर होताच दरवर्षी माता-पित्यांची प्रवेशासाठी टिकटिक सुरू होते. करिअर कोणत्या क्षेत्रात घडवायचे ही चिंता सतावत असताना "लोकमत"ने शैक्षणिक प्रदर्शनीच्या माध्यमातून दालन उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. "लोकमत"ने विद्यार्थ्यांसाठी सोल्युशन काढले असून ही समाज घडविण्याची तळमळ आहे. आज स्पर्धेच्या युगात कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचे, हे कन्फ्युजन दूर करून "लोकमत"ने सोल्युशन काढले आहे. "लोकमत"ने जगण्यासाठीच्या वाटा दाखविल्या असून या उपक्रमाला सलाम करूया. शैक्षणिक प्रदर्शनीला पाल्यांनी पालकांसह अवश्य भेट द्यावी, असे आवाहनही श्रीकांत देशपांडे यांनी केले. संचालन ‘लोकमत’चे वितरण प्रबंधक रवि खांडे यांनी केले.