लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अप्पर वर्धा प्रकल्पाच्या काही किमी अंतरावरच शिरखेड गाव असताना या परिसरात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे या गावाची पाणीटंचाई जोवर सुटत नाही तोवर स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांनी रविवारी जाहीर सभेत दिली.शिरखेड येथील नाना गुरू क्रीडा मंडळाच्यावतीने जाहीर प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणा बोलत होत्या. तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या समवेत पाठपुरावा करून शिरखेड व परिसरातील गावांचा पाणीप्रश्न धसास लावू, असे राणा म्हणाल्या.शिरखेड गावांअंतर्गत रस्ते, नाल्या, त्यावरील पूल, सांस्कृतिक भवन, गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी नाना-नानी पार्क आदी कामे करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा म्हणाल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई) गट, पीरिपा (कवाडे) गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, आम आदमी पार्टी, खोरिपा यासह मित्र पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.शरद पवार यांची आज सभामहाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची सभा आयोजित केल्याची माहिती महाआघाडीच्या नेत्यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार येत असल्याने दुधात साखर पडणार असल्याचे रिपाइं (गवई) गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई म्हणाले. कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा येणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सागितले. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, आ. रवि राणा, ज्येष्ठ नेते शरद तसरे, सुनील वºहाडे, किशोर बोरकर, चरणदास इंगोले, राजेंद्र महल्ले, कांचनमाला गावंडे, हरिभाऊ मोहोड, गणेश रॉय, प्रवीण मोहोड यासह महाआघाडीतील ५६ पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Lok Sabha Election 2019; पाणीप्रश्न सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:42 IST
अप्पर वर्धा प्रकल्पाच्या काही किमी अंतरावरच शिरखेड गाव असताना या परिसरात भीषण पाणीटंचाई आहे. त्यामुळे या गावाची पाणीटंचाई जोवर सुटत नाही तोवर स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत राणा यांनी रविवारी जाहीर सभेत दिली.
Lok Sabha Election 2019; पाणीप्रश्न सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
ठळक मुद्देनवनीत राणा : शिरखेडच्या जाहीरसभेत नागरिकांना ग्वाही