शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; आज थंडावणार प्रचारतोफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:10 IST

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता म्हणजेच मतदान ंसंपण्याचे ४८ तास अगोदर प्रचाराचा धुराडा खाली बसणार आहे. त्यानंतर मात्र, कुणालाच प्रचार जाहीर प्रचार करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांसह राजकीय नेत्यांचा गृहभेटीवर भर राहणार आहे.

ठळक मुद्देमतदानाचे काऊंटडाऊन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता म्हणजेच मतदान ंसंपण्याचे ४८ तास अगोदर प्रचाराचा धुराडा खाली बसणार आहे. त्यानंतर मात्र, कुणालाच प्रचार जाहीर प्रचार करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांसह राजकीय नेत्यांचा गृहभेटीवर भर राहणार आहे.अमरावती लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान होणार आहे. मंगळवारी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये प्रचार रॅली काढून शक्तिप्रदर्शनावर उमेदवारांचा भर राहणार आहे. त्यानंतर मात्र जाहीर प्रचारावर बंदी आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांच्या कालावधीत भरारी पथके, स्थिर निगराणी पथके, पोलीस विभाग तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचा मतदारांना पैशांचे वाटप, दारू यावर ‘वॉच’ राहणार आहे. मतदारांना प्रलोभन वा कोणतीही कृती करता येणार नाही, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. प्रचार बंद झाल्यावर शासकीय यंत्रणा वगळता अन्य कुठेही ध्वनिक्षेपक राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना आहेत. मतदान १८ एप्रिलला असल्याने १७ तारखेला सबंधित सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयातून मतदार पार्ट्या रवाना होतील. निवडणूक संदर्भातील तयारी पूर्ण झालेली असल्याचे या विभागाने सांगितले.लोकसभा निवडणुकीसाठी दोन हजार मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर प्रत्येकी चार व काही प्रमाणात राखीव असे ८ हजार ८१२ अधिकारी व कर्मचारी राहणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना आतापर्यंत तीन वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. बुधवारी या पार्ट्यांना मतदान साहित्य दिले जाणार आहे. जिल्ह्यात स्वीप मोहिमेत सर्वदूर जनजागृतीसह आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. स्वीप मोहिमेत विविध विभागांनी गावोगाव शेकडो कार्यक्रम, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिके घेतली आहेत. मतदाराचे हक्क, कर्तव्य व जाणीवजागृतीचे कार्य या मोहिमेतून होत आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले आहेत. नागरिकांनीही मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.२०० मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगयंदा प्रथमच वेब कास्टिंगद्वारे २०० केंद्रांवरील मतदानाच्या प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे प्रक्षेपण एआरओ, डीडीआरओ, आरओ, सीईओ (मुंबई) व निवडणूक आयोग (दिल्ली) येथे पाहात येणार आहे. मतदान कोणाला केले, ही शंका दूर करण्यासाठी यंदा प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएमचे डमी मॉडेल उपलब्ध केले जाणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक व पोलिसांचे पथक राहणार आहे.बाहेरच्या व्यक्तींना मतदारसंघामध्ये राहण्यास प्रतिबंधप्रचाराची मुदत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संपत आहे. या मुदतीनंतर ज्या व्यक्तींची नावे मतदार यादीत नाहीत अशांनी व अन्य जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींनी मतदानाची प्रक्रिया होइस्तोवर जिल्ह्यात थांबू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. १६ ते १८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत कलम १४४ जारी करण्यात आले आहे.२० हजारांवर रकमेसाठी पुरावेमतदान प्रक्रियेत कोणालाही २० हजारांवर रोख रक्कम बागळता येणार नाही. जादा रकमेसंदर्भातील पुरावे जवळ नसल्यास ती जप्त होण्याची शक्यता आहे. मतदाराला लाच देणे, धमकावणे, भीती दाखविणे, अवैधरीत्या शस्त्रास्त्रे बाळगणे व सामाजिक शांततेचा भंग करणे हे प्रकार भादंवि नुसार गुन्हा असून, मतदार शिक्षेस पात्रदेखील राहू शकतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती