शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; १३३ गावांसाठी वनविभागाला साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:40 IST

मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाटात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून धारणी व चिखलदरा तालुक्यातील संपर्क क्षेत्राबाहेरील १३३ गावांसाठी वन विभागाच्या वायरलेस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देआयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : मेळघाटात मतदानाची रंगीत तालीम

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या मेळघाटात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणून धारणी व चिखलदरा तालुक्यातील संपर्क क्षेत्राबाहेरील १३३ गावांसाठी वन विभागाच्या वायरलेस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: सोमवारी वैराट येथे जाऊन संपूर्ण माहिती घेतली. मतदानाच्या दिवशीची टक्केवारी मिळवण्यासाठी १३३ गावांमध्ये तात्पुरत्या उभारल्या जाणाऱ्या यंत्रणेचे त्यांच्यासमक्ष प्रात्यक्षिक करण्यात आले.चिखलदरा व धारणी तालुक्यातील संपर्कविहीन १३३ गावासाठींची संपर्क यंत्रणा कशी, हे जाणून घेण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी व संबंधित झोनल अधिकाऱ्यांना सोमवारी सकाळी ८ वाजताच संबंधित गावात पाठविण्यात आले. हे सर्व अधिकारी दिवसभर मेळघाटच्या अतिदुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये गेले. निवडणुकीदरम्यान करण्यात येणाºया सर्वच प्रकारची माहिती त्यांनी गोळा केली. तेथून नजीकच्या वायरलेस केंद्रावरून चिखलदरालगतच्या वैराट येथील कंट्रोल रूमवर ती माहिती पाठविली. रायपूर, सेमाडोह, आत्रू चौराकुंड, हरिसाल, ढाकणा, डोलार, तारूबांदा, चिखली, आवागड या जवळपासच्या २० सबस्टेशनवरून वैराट कंट्रोल रूमकडे माहिती पाठविण्यात आली.आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली स्थितीजवळपास १३३ गावांतील माहिती मिळणे कठीण असते. मतदान आटोपल्यावर ईव्हीएम येण्यास उशीर होतो. ही बाब लक्षात घेऊन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सोमवारी सकाळी १० वाजता स्वत: वैराट येथे जाऊन प्रात्यक्षिक घेतले. त्यापूर्वी ८ वाजता परतवाडा येथील फातिमा कॉन्व्हेंटमधून निवडणूक पथके मेळघाटात पाठविली. ती पथके पोहोचली किंवा त्यांना काय अडचणी आल्यात, प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी कुठल्या अडचणी उद्भवू शकतात, याचा धांडोळा घेतला.पहिल्यांदा वनविभागाची मदतमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित व अतिसंरक्षित जंगलात वसलेल्या १३३ गावांमध्ये पहिल्यांदा निवडणुकीसाठी जवळपास २२ वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. वनविभागाची वाहने व अधिकारी निवडणूक कामात प्रत्यक्ष भाग घेणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मेळघाटात आदिवासींच्या सुख-दु:खाची प्रशासनाला माहिती पोहोचविण्यासाठी याच वायरलेस यंत्रणेचा उपयोग केला जातो.ज्या ठिकाणी मोबाइलने संपर्क होऊ शकत नाही, मेळघाटातील अशा गावांमध्ये वनविभागाच्या वायरलेस यंत्रणेमार्फत लोकसभा निवडणुकीसंदर्भातील माहिती घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात सोमवारी वैराट येथे प्रत्यक्ष पाहणी केली.- शैलेश नवालजिल्हाधिकारी, अमरावती