शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; रवि राणांविरुद्ध देवपारेंची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:14 IST

भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य करणारे आ. रवि राणा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या निवडणूक प्रतिनिधीने मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत केली.

ठळक मुद्देआंबेडकरांच्या आशीर्वादाचा मुद्दा : प्रकरण सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद असल्याचे वक्तव्य करणारे आ. रवि राणा यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार वंचित आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या निवडणूक प्रतिनिधीने मंगळवारी गाडगेनगर पोलिसांत केली. पोलिसांनी ती तक्रार निवडणूक विभागाच्या आचारसंहिता कक्षाकडे पाठविली. नोडल आॅफिसर तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी ती तक्रार अमरावती विधानसभेचे सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे चौकशीकरिता पाठविली आहे.वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांचे निवडणूक प्रतिनिधी रवींद्र मुंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आ. रवि राणा व अपक्ष उमेदवार नवनीत राणा अमरावती लोकसभेतील मतदारांना संभ्रमित व विचलित करीत आहे. आमच्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन अपप्रचार करीत आहेत. ३ एप्रिल रोजी नवनीत राणा यांच्या शेगाव नाक्यावरील प्रचारसभेत त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा आशीर्वाद असल्याचे भाष्य केले होते. ८ एप्रिल रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील सभेतसुद्धा आ. रवि राणा यांनी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा नवनीत राणा यांना अदृश्य (छुपा) पाठिंबा असल्याचे सांगितले तसेच पाठिंबांसदर्भात आंबेडकर यांना दोन वेळा भेटलो, असे वक्तव्य आ. राणा यांनी केले. त्यांचे वक्तव्य हे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असून, सोशल मीडियावरही फिरत आहे. आ. राणांच्या या वक्तव्यामुळे मतदारांमध्ये व निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे.गुणवंत देवपारे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्यामुळे रवि राणांचे हे उद्गार धादांत खोटे व मतदारांची फसवणूक करणारे आहे. लोकप्रतिनिधी असलेले रवि राणा यांच्याकडून मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आ. रवि राणा व अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार देवपारेंचे निवडणुक प्रतिनिधी रवींद्र मुंद्रे यांनी पोलिसांत केली आहे.गाडगेनगर पोलिसांकडून तक्रार प्राप्त झाली. पुढील चौकशी व पडताळणीसाठी ती अमरावती विधानसभा सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे पाठविली आहे. यासंदर्भात पुढील कार्यवाहीचा निर्णय ते देतील.- संदीप जाधव, नोडल आॅफिसर, निवडणूक विभागतक्रार प्राप्त झालेली आहे. हा विषय निवडणूक विभागाशी संबंधित असल्याने ती तक्रार आचारसंहिता कक्षाकडे पाठविण्यात आली आहे. चौकशीअंती पुढील कारवाईची दिशा ठरेल.- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019