शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नवनीत राणा यांची संवाद अन् आशीर्वाद रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:46 IST

महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी शहरातील अनेक भागांत आशीर्वाद अन् संवाद रॅली काढली. रॅलीदरम्यान त्यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

ठळक मुद्देनागरिकांचा प्रतिसाद : संत गाडगेबाबा, भाऊसाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत रवि राणा यांनी शहरातील अनेक भागांत आशीर्वाद अन् संवाद रॅली काढली. रॅलीदरम्यान त्यांनी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या रॅलीत नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.नवनीत यांनी सोमवारी सकाळी येथील पंचवटी, गाडगेनगर, राधानगर, प्रेरणा कॉलनी, शिवार्पण कॉलनी, पलाश लाइन, देशमुख कॉलनी, खोंडे लाइन, प्रीतम कॉलनी, अप्पू कॉलनी, तारांगणनगर, इस्कॉन मंदिर आदी परिसरात जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट) यासह मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.नवनीत राणा यांना विविध संघटनांचा लेखी पाठिंबानवनीत राणा यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, विश्वकर्मा लोहार समाज, बेलदार सेवा संघटन, आदिवासी युवा अधिकार संघटना, माळी समाज परिषद अमरावती जिल्हा, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन आदी संघटनांनी लेखी पाठिंबा जाहीर केला आहे.न्यायालयात वकिलांच्या भेटी घेऊन नवनीत राणा यांचा प्रचारअमरावती : लोकसभा निवडणूक ुरिगणातील महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी सोमवारी न्यायालयात वकिलांच्या भेटी घेऊन सहकार्य करण्याबाबत आवाहन त्यांना केले. त्या पुनर्निरीक्षण याचिकेच्या अनुषंगाने सोमवारी न्यायालयात हजर झाल्या. ‘एका दगडात दोन पक्षी’ त्यांनी उमेदवार म्हणून वकिलांच्या भेटी घेऊन प्रचारदेखील केला.लोकसभा निवडणुकीतील प्रचारतोफा १६ एप्रिल रोजी थंडावणार आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाआघाडीच्या नवनीत राणा यांनी सोमवारी दुपारी जिल्हा न्यायालय गाठले. वकिलांच्या कक्षात जाऊन त्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या. प्रत्येकाला नमस्कार करून सहकार्य करण्याबाबत विनंती केली. विशेष करून, महिला वकिलांच्या भेटी घेऊन नवनीत राणा यांनी संवाद साधला. यावेळी अ‍ॅड. दीप मिश्रा, अ‍ॅड. परवेज खान, अ‍ॅड. मधुसूदन माहुरे, अ‍ॅड. अनिल जयस्वाल, अ‍ॅड. झिया खान, अ‍ॅड. वसीम शेख, अ‍ॅड. चंद्रसेन गुळसुंदरे व अन्य काही वकील मंडळींनी परिचयातील वकिलांची भेट नवनीत राणा यांच्याशी करून दिली. त्यांच्या प्रचार दौऱ्याला वकील मंडळींचा चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, खा. आनंदराव अडसूळ यांचे वकील उपस्थित नसल्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी ३० एप्रिल ही तारीख दिली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती