शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

Lok Sabha Election 2019; निवडणूक खर्चात नवनीत आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:48 IST

लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या २४ उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रचाराच्या दुसºया टप्यातील निवडणूक खर्च सादर केला. यात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांनी १२ लाख ८९ हजार ४७० रुपये खर्चाचा हिशेब सादर केला. त्या खर्चाबाबत आघाडीवर आहेत.

ठळक मुद्देअपक्षांचा हात आखडता : पाठोपाठ वानखडे, अडसूळ तिसरे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणूक रिंगणात असलेल्या २४ उमेदवारांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे प्रचाराच्या दुसºया टप्यातील निवडणूक खर्च सादर केला. यात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांनी १२ लाख ८९ हजार ४७० रुपये खर्चाचा हिशेब सादर केला. त्या खर्चाबाबत आघाडीवर आहेत.बसपाचे उमेदवार अरुण वानखडे यांनी ११ लाख ४८ हजार १०० रुपये खर्च सादर केला. ते दुसºया स्थानी आहेत. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी १० लाख ४५ हजार ६८२ रुपये निवडणूक खर्च केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी केवळ २ लाख ६२ हजार ९४७ रुपये खर्च केले आहेत.सर्वात कमी खर्च सादर करणाऱ्यांमध्ये राजू मानकर आणि अनिल जामनेकर या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्यांनी प्रत्येकी १२ हजार ५०० रुपयांचा खर्च दर्शविला आहे.उल्लेखित प्रमुख चार उमेदवारांचा खर्च हा लाखांच्या घरात असताना इतर उमेदवारांचा आतापर्यंतचा निवडणूक खर्च हजारांच्या घरातच असल्याचे निवडणूक खर्च विभागाच्या माहितीपत्रावरून दिसून येते.लोकसभा लढवित असलेल्या उमेदवाराने निवडणूक कालावधीत होणाºया प्रत्येक खर्चाचा तपशील पुराव्यानिशी (पावती) निवडणूक खर्च कक्षाला सादर करणे आवश्यक आहे. पहिल्या व दुसºया टप्प्यातील खर्चाचा हिशेब २४ उमेदवारांनी निवडणूक खर्च विभागाकडे सादर केला आहे. उमेदवारांना निवडणुकीसाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे.उमेदवारांना हिशेब सादर करण्यासाठी निवडणूक खर्च विभागाने तयार केलेल्या नियोजनानुसार २४ उमेदवारांचे प्रत्येकी आठ याप्रमाणे अ, ब, क असे तीन गट पाडण्यात आले आहेत. त्यानुसार दुसºया टप्प्यातील निवडणुकीचा खर्च उमेदवारांनी सादर केला आहे.उर्वरित २० उमेदवारांचा निवडणूक खर्चनीलिमा भटकर १ लाख ६० हजार ८९९, संजय आठवले १ लाख २० हजार ७४०, पंचशीला मोहोड ७७ हजार ४४०, पंकज मेश्राम ७३ हजार ४४७, ज्ञानेश्वर मानकर ४९ हजार ५५०, मीनाक्षी करवाडे ३७ हजार ९३५, राहुल मोहोड ३७ हजार २५०, अंबादास वानखडे २४ हजार ९१, प्रमोद मेश्राम २२ हजार ५००, विनोद गाडे २० हजार ५०, नरेंद्र कठाणे १८ हजार ६००, श्रीकांत रायबोले १६ हजार ९५०, राजू सोनोने १५ हजार ९४०, विलास थोरात १४ हजार ५५१, राजू जामनेकर १३ हजार ४५०, प्रवीण सरोदे १३ हजार ३०, नीलेश पाटील १२ हजार ६००, विजय विल्हेकर १२ हजार ६००, अनिल जामनेकर १२ हजार ५०० आणि राजू मानकर १२ हजार ५०० रुपये याप्रमाणे खर्च सादर केला आहे.सहा उमेदवार लाखांत, इतरांचा खर्च हजारांतलोकसभा निवडणूक लढवित असलेल्या २४ उमेदवारांनी निवडणूक खर्च विभागाकडे सादर केलेल्या खर्चाचा अहवालानुसार, प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह सहा जणांनी १२ लाखांपर्यत निवडणुकीत खर्च केल्याचे दिसून येते. मात्र, उर्वरित १८ अपक्ष उमेदवारांचा खर्च हा हजारांच्या घरात असल्याचे आकडेवारीवरू न स्पष्ट होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019