शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मोदी हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:11 IST

अतिरेक्य्यांचे अड्डे बनवून जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्ताला धडा शिकविण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान हवे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे मंगळवारी केले.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे : आघाडीला चार वर्षांनंतर दिसला दुष्काळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अतिरेक्य्यांचे अड्डे बनवून जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्ताला धडा शिकविण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान हवे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे मंगळवारी केले.येथील नेहरू मैदानावर आयोजित भाजपा-शिवसेना-रिपाइं (आठवले) महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख, विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर, डॉ. दीपक सावंत, आ. अरुण अडसड, श्रीकांत देशपांडे, अनिल बोंडे, माजी खासदार अनंत गुढे, दिनेश बूब, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, प्रशांत वानखडे, श्याम देशमुख, कृपाल तुमाने, विजयराज शिंदे, प्रीती बंड, सुधीर सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर उपस्थित होते.पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात युती का झाली? यातून काँग्रेस-राष्ट्रवादी अद्यापही सावरली नाही. युती ही हिंदुत्वाच्या विचाराची; देशाची अखंडता, अयोध्येत राममंदिर उभारणीच्या मुद्द्यावर झाली आहे. काही मुद्द्यांवर भाजपसोबत वाद होता. पण, ते निकाली निघाले आहेत. त्यामुळे आता भाजप-शिवसेना महायुती ही निवडणुकीत एकदिलाने काम करीत आहे. महायुतीचाच विजय होणार, असा विश्वास त्यांनी दर्शविला. चार वर्षात आघाडीचे नेते कुठेच नव्हते. आता दुष्काळ नसताना त्यांना तो दिसू लागला आहे. दुष्काळात मी स्वत: मराठवाड्यात शिवसेनेच्या ६३ आमदारांना सोबत घेऊन दौरा केला. शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले आणि भरीव मदतदेखील केली. महायुती ही सत्तेसाठी नव्हे, तर हिंदुत्वाचे रक्षण व देशाचा विकासासाठी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.