शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; महाआघाडी समर्थित नवनीत राणा यांची उमेदवारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:50 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी मंगळवारी येथील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या उमेदवार नवनीत रवि राणा यांनी मंगळवारी येथील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट) चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांची यावेळी सोबत होती.महाआघाडीच्या मित्रपक्षांची सभा राजापेठ येथे सकाळी पार पडली. त्यानंतर नवनीत राणा यांनी विविध पक्षांच्या नेत्यांसह बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. महाआघाडीमधील पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.धनंजय मुंडे यांची सभानवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धनंजय मुंडे यांची राजापेठ येथे पुलाखालच्या मोकळ्या जागेत जाहीर सभा झाली. व्यासपीठावर माजी मंत्री अनिल देशमुख, कमलताई गवई, आमदार रवि राणा, माजी मंत्री वसुधा देशमुख, रिपाइं (गवई गट) चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे, माजी आमदार रावसाहेब शेखावत, विश्वासराव देशमुख, माजी आमदार राजकुमार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे, पुष्पा बोंडे, किशोर बोरकर, उषा उताणे, वसंतराव साऊरकर, प्रकाश साबळे, रामेश्वर अभ्यंकर यांच्यासह युवा स्वाभिमान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट), पीरिप (कवाडे गट), खोरिप, बहुजन विकास आघाडी, शेकापसह महाआघाडीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी अनिल देशमुख, रावसाहेब शेखावत, राजकुमार पटेल, डॉ. राजेंद्र गवई यांचीही भाषणे झाली.आतापर्यंत ३६ उमेदवारांचे अर्जमंगळवारी अखेरच्या दिवशी नीलेश आनंदराव पाटील (आरिपा), नीलिमा नितीन भटकर (पीपीआय), सुनील डेव्हीड डोंगरदिवे (बहुजन मुक्ती पार्टी), पंचशीला विजय मोहोड (बहुजन मुक्ती मोर्चा), अपक्ष रीतेश गुलाबराव गवई, राजू नारायण कुºहेकर, राजू जामनेकर, सुमित्रा गायकवाड, प्रवीण महादेवराव सरोदे, आनंद श्रीराम धवणे, पंकज लीलाधर मेश्राम, लीलाधर तोताराम मेश्राम, लीलाधर शेषराव थोरात, अनिल नामदेवराव जामनेकर, रावसाहेब पुंडलिक गोंडाणे, राजू मानकर, दिनेश गुलाबराव गवई, प्रमोद लक्ष्मणराव मेश्राम, देविदास मनाजी तेलगोटे, किसनराव शेषराव शेंडे, गाझी सदोद्दीन जहीर अहमद आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. याव्यतिरिक्त अरुण वानखडे (बसपा) व आनंदराव अडसूळ (शिवसेना) यांनीही पुन्हा मंगळवारी अर्ज दाखल केला. आतापर्यंत ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.२९ मार्चला माघारउमेदवारी अर्जांची छाननी जिल्हाधिकारी कार्यालयात २७ मार्चला सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. उमेदवार किंवा त्याचे अधिकृत सूचक वा निवडणूक प्रतिनिधी यांना २९ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान मतदान होईल.१०२ जणांनी नेले २१२ अर्जलोकसभा निवडणुकीसाठी १९ मार्चपासून अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १०२ जणांनी २१२ अर्ज नेले. त्या तुलनेत ३६ उमेदवारांनी ५१ अर्ज दाखल केलेत. १९ मार्चला ३५ व्यक्तींनी ७२, २० ला १७ व्यक्तींनी ४१, २२ ला २७ व्यक्तींनी ६०, २५ ला १९ व्यक्तींनी ३४, तर २६ मार्चला चार व्यक्तींनी पाच अर्ज नेले होते.