शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

Lok Sabha Election 2019; नेत्यांचाच सुटू लागला तोल, लावायचे कुणाला बोल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:11 IST

मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असताना नेत्यांनी संयमाची वीण अधिक घट्ट करणे अपेक्षित आहे. तथापि जळगाव-अळमनेर प्रमाणेच अमरावती लोकसभेच्या राजकारणातही जबाबदार नेत्यांचा तोल सुटू लागल्याने मतदारांमध्ये मनोरंजनाचे; पण उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. परवा जरूडमध्ये सभा झाली.

अमरावती : मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असताना नेत्यांनी संयमाची वीण अधिक घट्ट करणे अपेक्षित आहे. तथापि जळगाव-अळमनेर प्रमाणेच अमरावती लोकसभेच्या राजकारणातही जबाबदार नेत्यांचा तोल सुटू लागल्याने मतदारांमध्ये मनोरंजनाचे; पण उमेदवारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.परवा जरूडमध्ये सभा झाली. युतीच्या प्रचारार्थ ती सभा होती. शिक्षणाने डॉक्टर असलेले आणि अनुभवाने जाणकार झालेले मोर्शीचे भाजप आमदार अनिल बोंडे हे त्या सभेला संबोधित करीत होते. दरम्यान, कुणी एका इसमाने सभेत पाणीटंचाई का सुटत नाही, असा सवाल बोंडे यांना विचारला. बोंडे पाटील खवळले. त्या इसमाला अटक करण्याचे आदेशच त्यांनी पोलिसांना दिले. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत निवडून पाठविलेला आपलाच लोकप्रतिनिधी समस्या निर्मूलनाबाबत जाब विचारला म्हणून मतदारराजाला कोठडीत डांबण्याचा आदेश देईल, असे तेथील लोकांच्या मनात चुकूनही आले नव्हते. त्याचमुळे या प्रसंगाचे वेगवान पडसाद उमटले. आपण दिलेल्या मतांवर अनिल बोंडे हे आमदार झालेत. विधानसभेत पोहोचले. सुखसुविधा, अधिकार त्यांना मिळाले. आता पुन्हा युतीच्या उमेदवारासाठी मतांचा जोगवा मागायला ते आपल्या दारी आलेत. याचकाने हात जोडून येणे शोभनीय आहे; परंतु याचकच 'राजा'ला सत्तेचा धाक दाखवत असेल तर? हा विचार गावकऱ्यांचा मेंदू जागा करून गेला. जरुडवासीयांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचे जाहीर केले. लोकशाहीचा महोत्सव पारदर्शकपणे पार पडावा, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाची असताना, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी या एकूणच घटनेची 'पारदर्शक' दखल घेतली की कसे, याबाबत त्या परिसरातील मतदार अनभिज्ञ आहेत.ज्येष्ठ आमदाराला सुनावले खडे बोलदुसरी घटना दर्यापूर तालुक्यातील. प्र्रकाश भारसाकळे या भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याने आनंदराव अडसूळ यांच्या विजयासाठी दर्यापुरात सभेचे आयोजन केले. दर्यापूरचे भाजपचे आमदार रमेश बुंदिले आणि प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी-दर्यापूर पालिकेच्या नगराध्यक्ष हेदेखील त्या सभेला उपस्थित होते. आम्हाला माहिती दिली नाही, बोलविले नाही, या मुद्यावरून तालुका भाजपला ती सभा पक्षसंमत वाटली नाही. त्यांनी जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली. सूर्यवंशी धावून गेले. आमदार बुंदिले यांच्या कार्यालयात पत्रपरिषद भरवली. एकदाही आमदारकी निवडून न आलेल्या दिनेश सूर्यवंशी यांनी सहाव्यांदा आमदार असलेले भारसाकळे यांची ज्या शब्दांत कानउघाडणी केली, ते शब्द - ती तºहा पक्षसंमत आहे काय, असा प्रश्न विचारवंतांना पडतोच!आनंदराव अडसूळ यांच्या विजयासाठी बैठकीचे आयोजन करणे हा काय गुन्हा झाला? इतकी वर्षे मी राजकारणात आहे, जिंकण्याचे-जिंकवण्याचे मेरिट आहे, मग पक्षात मला काहीच महत्त्व नसावे काय? बैठकदेखील दिनेश सूर्यवंशी यांनाच विचारून घ्यायची काय? असे प्रश्न भारसाकळे यांचे आहेत. ज्यांच्यासाठी ही बैठक होती, ते आनंदराव अडसूळ नावाप्रमाणे आनंदाने बैठकीत सहभागी झालेत; पण 'सूर्यवंशी' असलेले भाजप जिल्हाध्यक्ष आगीप्रमाणे बरसले. भाजपची संस्कृती, ज्येष्ठांचा सन्मान, पक्षाची प्रतिमा आणि उमेदवाराच्या प्रचाराची लयबद्धता शब्दांच्या त्या दाहकतेमुळे होरपळली, याची चिंता कुणी करायची?कार्यकर्त्यांच्या गर्दीत विचारांच्या धडका होणारच; पण त्याचा कलह होऊ न देता सर्वांनाच सोबत नेण्याचे प्रयत्न नेत्याने करू नयेत का? नेत्यांचे-पदाधिकाऱ्यांचेही मतभेद असणारच. लोकशाहीचे ते सौंदर्यच! पण कार्यकर्त्यांदेखत नेतेच संयम सोडून वागायला लागले, तर बोल तरी कुणाला लावायचे? 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019