शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यातील इटकी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 14:01 IST

दर्यापूर तालुक्यातील इटकी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले. गाव मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने या निर्णयाप्रत पोहोचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ठळक मुद्देमुलभूत सुविधांपासून वंचित तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दर्यापूर तालुक्यातील इटकी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले. गाव मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने या निर्णयाप्रत पोहोचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.गावालगत असलेल्या गणेश नाला व मासोळी नाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाल्यावरील तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पूल जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात इटकीपासून दर्यापूर- अंजनगावला जोडणाऱ्या रस्त्यावरून प्रवास अत्यंत कठीण होऊन जातो. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटतो. गावातील आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, तर शाळकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होते.दोन्ही पुलांचे बांधकाम, सांगळुद ते इटकी रस्त्याचे खडीकरण व गावातील स्मशानभूमीचा रस्ता बनवावा, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत अनेक वेळी तोंडी व लेखी निवेदने देण्यात आली. मात्र, समस्या अद्याप ‘जैसे थे’ आहे.लोकप्रतिनिधींनीसुद्धा या ज्वलंत समस्येवर लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी श्रीकृष्ण चव्हाण, नीलेश गहले, अश्विन मोहोड, शरद गहले, धीरज तांबडे, भारत चौरपगार, सतीश मोहोड, शिवाजी म्हैसने, अनिकेत रोकडे, शरद इंगोले, धीरज वडतकर, अक्षय गायकवाड, पवन गावंडे, धम्मपाल रायबोले, योगेश आठवले, भूषण सपकाळ यांच्यासह श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.आम्ही गावकरी भारतीय संविधानाचा आदर करतो. मात्र, गावासाठी महत्त्वाच्या असलेल्या पूलबांधणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. मूलभूत सुविधांपासून गावकरी वंचित आहेत. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- श्रीकृष्ण चव्हाण, अध्यक्ष, श्रीगुरुदेव सेवा मंडळ, इटकी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक