शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; खासदारांच्या पीएला जेनेरिक औषधी केंद्र कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:49 IST

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र स्थानिक शिवसैनिकांना, बेरोजगारांना वा अपंग-गरजूंना न देता ते स्वत:चे स्वीय सहायक सुनील भालेराव यांना (पत्नीच्या नावे) देण्यात आले. अमरावती लोकसभा क्षेत्रातील एकही स्थानिक व्यक्ती खासदारांना का दिसली नाही, असा सवाल युवा स्वाभिमानी पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे.

ठळक मुद्देरवी राणा : स्थानिक शिवसैनिक वाऱ्यावर, अपंगांनाही डावलले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र स्थानिक शिवसैनिकांना, बेरोजगारांना वा अपंग-गरजूंना न देता ते स्वत:चे स्वीय सहायक सुनील भालेराव यांना (पत्नीच्या नावे) देण्यात आले. अमरावती लोकसभा क्षेत्रातील एकही स्थानिक व्यक्ती खासदारांना का दिसली नाही, असा सवाल युवा स्वाभिमानी पार्टीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी राष्ट्रपतींना केली आहे.मुंबईत वास्तव्य असणाºया आनंदरावांनी खासदार होण्यासाठी अमरावतीतून उमेदवारी भरायची, निवडून येण्यासाठी स्थानिक शिवसैनिकांची मते वापरायची, त्यांना राबवून घ्यायचे आणि निवडून आल्यानंतर बुलडाण्याच्या खासगी सचिवाचे घर भरायचे; हेच का अमरावतीच्या मातीशी इमान, असा संतप्त सवाल आमदार राणा यांनी केला आहे.अपंग, अंध व मतिमंदांसाठी शासनाकडून तीन टक्के जागा आरक्षित आहे. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील त्या आरक्षित जागेवर जनऔषधी क़ेंद्राला मान्यता मिळवून खासदारांचे खासगी सचिव सुनील भालेराव यांनी डल्ला मारला. जिल्हाधिकारी कार्यालयातील मोक्याची १२.६० चौरस मीटर जागा सुनील भालेराव यांच्या पत्नी मीनाक्षी भालेराव या प्रमुख असलेल्या आस्था मल्टिपर्पज ह्युमन राइट्स फाउंडेशन (बुलडाणा) या संस्थेला देण्यात आली. तसा करारनामा जिल्हा सेतु समिती (अमरावती) च्या सदस्य सचिवांकडून मीनाक्षी भालेराव यांच्याशी करण्यात आला आहे. ती मोक्याची जागा जुलै २०१७ पासून पुढील पाच वर्षे भालेराव यांच्या संस्थेला प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राकरिता देण्यात आली आहे. ना खासदाराचे, ना त्यांच्या स्वीय सहायकाचे अमरावतीशी नाते आहे, आपुलकी आहे. बेरोजगार, गरीब, अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले किंवा विधवा यापैकी कुणालाही त्या औषधी केंद्राने जगविले असते. परंतु, जनतेला मते मागून सत्ता मिळवायची आणि सत्तेच्या भरवशावर सर्व लाभ घरात अन् चेलेचपाट्यांना द्यायचे, ही आनंदराव अडसुळांची नीती आहे, असा प्रहार आमदार राणा यांनी केला.२२.५० टक्के नफा दरमहा तीन लक्ष उत्पन्नमीनाक्षी भालेराव यांना या जनऔषधी केंद्रातून २२.५० टक्के नफा व महिन्याकाठी तीन लाख रुपयांचा नफा मिळत असल्याचा आरोप आमदार रवि राणा यांनी केला. या जनऔषधी कें द्राद्वारे १० ते १५ शिवसैनिकांना रोजगार मिळू शकला असता; मात्र तसे न करता केंद्र शासनाकडून ५० हजार रुपये पगार घेणाºया बुलडाणा येथील सुनील भालेराव यांना का देण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी आमदार राणा यांनी केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावती