शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; निवडणूक विभाग जागला तीन दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 01:34 IST

निवडणूक प्रक्रिया राबविणे हे मोठ्या जोखमीचे काम समजले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी काही दिवसांपासून रात्रंदिवस राबत आहेत. १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांत जिल्ह्याच्या निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय जागे असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देगालबोट नाही : प्रत्येक दिवस सतर्कतेचा, महिलांचेही उल्लेखनीय कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवडणूक प्रक्रिया राबविणे हे मोठ्या जोखमीचे काम समजले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी काही दिवसांपासून रात्रंदिवस राबत आहेत. १७ ते १९ एप्रिल या तीन दिवसांत जिल्ह्याच्या निवडणूक विभागासह जिल्हाधिकारी कार्यालय जागे असल्याचे दिसून आले.लोकसभेच्या निवडणुकीची तयारी वर्षभरापासून सुरू असली तरी आचारसंहिता सुरू झाल्यापासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. मात्र मतदानाचे पूर्वसंध्यापासून ते इव्हीएम स्ट्रांग रूम येऊन सील करेपर्यंतचे तीन दिवस जिल्हा निवडणूक विभागासह एआरओ स्तरावर जणू परीक्षा घेणारेच ठरले आहेत. लोकशाहीच्या या महाकुभांत कुठेही गालबोट न लागता निवडणूक प्रक्रिया निर्धोक व पारदर्शीपणे पार पडली. यामागे अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाºयांचे टिमवर्क महत्त्वाचे ठरले आहे.मतदानाचे साहित्य वाटपासून धावपळीला सुरूवात झाली. मतदानाचा दिवस यामध्ये सर्वात महत्त्वाचा ठरला. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व मतदारसंघातून ईव्हीएम नेमाणी गोडावून येथील स्ट्राँग रुममध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू असताना जिल्हा निवडणूक विभागच तात्पुरत्या स्वरूपात येथे स्थलांतरित झाला व येथेच नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. विधानसभानिहाय ईव्हीएम या ठिकाणी ट्रकद्वारे आणण्यात आलेत. या मशीनची मोजणी, किती खराब झाले ते परत आलेत काय, याची पडताळणी, सर्व मशीनची बूथनिहाय मोजणी नंतर सर्व ईव्हीएम नेमाणी गोडावून येथील स्ट्राँग रूमध्ये जमा करण्यात आल्यात. यावेळी तगडा सुरक्षा बंदोबस्त या प्रक्रियेत जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी व निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदारांसह जिल्हा निवडणूक विभागाचे सर्व कर्मचाºयांचे जागरण होत आहे. मात्र, लोकशाहीच्या महोत्सवात कामाचा कुठलाही ताण येवू न देता सर्वजण तत्परतेणे काम करीत आहेत.एक दिवस हक्काची रजानिवडणूक प्रक्रियेत तीन दिवस दिवस-रात्र जे अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर होते त्यांना शनिवारी हक्काची रजा राहणार आहे. वास्तविकता असा काही नियम नाही मात्र, असा प्रचलीतपणे सुरू आहे. त्यामुळे बहुतांश अधिकारी व कर्मचारी शनिवारी आराम करतील व पुन्हा नव्या जोशात कर्तव्यावर राहतील. मात्र या अवधीत महत्त्वाचे काम असल्यास कार्यलयातदेखील त्यांची उपस्थिती राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019