शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; भाजपचाही सेनेच्या हातात हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:29 IST

लोकसभा निवडणूकपूर्व युती झाल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या ‘साथी हाथ बढाना’ सुरू आहे. विशेष म्हणजे, भाजपक्षाचे सर्व पदाधिकारी जोमाने प्रचाराला भिडले आहेत. स्थानिक राजकारणात आ. रवि राणा यांना विरोध म्हणूनही प्रचाराची तीव्रता वाढतच आहे. काही ठिकाणी रुसवे फुगवेदेखील सुरू आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या दोन सभा : लोकसभेच्या प्रचाराआड विधानसभेची रंगीत तालीम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणूकपूर्व युती झाल्याने अमरावती लोकसभा मतदारसंघात सध्या ‘साथी हाथ बढाना’ सुरू आहे. विशेष म्हणजे, भाजपक्षाचे सर्व पदाधिकारी जोमाने प्रचाराला भिडले आहेत. स्थानिक राजकारणात आ. रवि राणा यांना विरोध म्हणूनही प्रचाराची तीव्रता वाढतच आहे. काही ठिकाणी रुसवे फुगवेदेखील सुरू आहेत.अमरावती लोकसभेच्या पालकत्वाची जबाबदारी भाजपद्वारे आमदार चैनसुख संचेती यांच्याकडे, तर लोकसभेचे प्रभारी पालकमंत्री प्रवीण पोटे व निवडणूक प्रमुख दिनेश सूर्यवंशी आहेत. शहरात आमदार सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, शहराध्यक्ष जयंत डेहणकर व नगरसेवक यांच्या नियमित बैठकीत कार्यालयात होतात. परंतु, शुक्रवारी युतीचे केंद्रीय कार्यालय सुरू झाल्याने त्या ठिकाणीदेखील सकाळ-सायंकाळी नियोजन सुरू असल्याचे दिसून आले.अडसुळांना स्वकीयांच्या विरोधाचा जेवढा सामना करावा लागला, तेवढा मित्रपक्षात होताना दिसत नाही. किंबहुना शिवसेनेच्या वाट्याला मतदारसंघ असल्याने उमेदवार कोण, ही त्यांची जबाबदारी. आम्ही युतिधर्म पाळणार ही भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासून घेतली आहे. जिल्ह्यात भाजपचे आमदार सुनील देशमुख, दर्यापूरचे आमदार रमेश बुंदिले व मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्यासोबत आनंदराव अडसूळ यांचे ट्युनिंग चांगले आहे. यासोबतच भाजपच्या अंतर्गत राजकारणात कुठलीही ढवळाढवळ करण्यात आनंदराव अडसूळ यांनी मागील दोन टर्ममध्ये स्वारस्य दाखविले नाही. याचा फायदादेखील त्यांना या निवडणुकीत होत आहे. युतिधर्म निभावताना फारसे रूसवे- फुगव्यांचा सामना आता अडसुळांना करावा लागला नाही.६७ हजार कार्यकर्त्यांची फळीलोकसभेसाठी बुथप्रमुख, शक्तिप्रमुख व विस्तारक अशी ६७ हजार कार्यकर्त्यांची फळी अडसुळांच्या पाठीशी आहे. नियमित बैठकीद्वारे नियोजन सुरू आहे. कार्यकर्ते कुठल्याही अपेक्षेविना, युतिधर्म निभवत आहेत.- दिनेश सूर्यवंशी, लोकसभा प्रमुखशिस्तबद्ध प्रचार, नियमित आढावाविधानसभा मतदारसंघनिहाय प्रमुखनेमलेले आहेत. याशिवाय पक्षाचे व उमेदवारांच्या नियोजनानुसार नियमित अन् अत्यंत शिस्तबद्ध प्रचार सुरू आहे. बैठकीद्वारे प्रचाराचा नियमित आढावा घेण्यात येतो. बूथप्रमुखांशी नियमित संपर्क सुरू आहे.- निवेदिता चौधरी, प्रदेश सचिव, भाजप

विधानसभा प्रमुखांच्या बैठकींचा रतीब अन् कार्यालयात आढावा1शहर कार्यालयात जयंत डेहणकर, महापौर सजंय नरवणे, नगरसेवकांसह बूथप्रमुख, विस्तारकांच्या नियमित बैठका व दिवसभराच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.2तिवसा येथे प्रदेश सचिव निवेदिता चौधरी व मतदारसंघ प्रमुख नामदेवराव मुंगले यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी प्रचार दौरे, दैंनदिन प्रचाराचे नियोजन केले जाते.3मेळघाट मतदारसंघ मोठा असल्याने विधानसभा प्रमुख आप्पा पाटील यांच्या जोडीला गोलू मुंडे व प्रवीण तायडे सोबतीला आहेत. गावनिहाय प्रचाराचा आढावा ते घेत आहेत.4दर्यापुरात प्रमुख अनिल पुंडलवार कार्यकर्त्यांशी संवाद, नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी संवाद, तर आ. बुंदिले बूथप्रमुख, शक्तिप्रमुखांशी संवाद करीत आहेत.5अचलपूर विधानसभाप्रमुख प्रताप अभ्यंकर कार्यकर्त्यांशी संवाद, रीतेश नवले हे कार्यकर्त्यांशी चर्चा व नीलेश सातपुते हे प्रचाराचे नियोजन यावर भर देत असल्याचे दिसून आले.6बडनेºयात व भातकुलीमध्ये शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय यांच्या स्वतंत्र बैठकी सुरू आहेत. उमेदवारांनी प्रत्येक भागात पोहोचलेच पाहिजे, यासाठीची चर्चा होत आहे.राजापेठ चौकातील भाजप कार्यालयात शहराध्यक्ष जयंत डेहनकर , महापौर संजय नरवणे, तुषार भारतीय आदींद्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. बूथप्रमुख, शक्तिप्रमुख यांना प्रचारासंदर्भात सूचना देताना.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019amravati-pcअमरावती