शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा : मतमोजणी गुुरुवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 01:08 IST

लोकसभा निवडणूक मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २३ मे रोजी होणारी मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. अमरावती मतदारसंघाचे लोकसभेतील प्रतिनिधी कोण राहणार, याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतमोजणीदरम्यान व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजाव्या लागणार असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब लागेल, असे संकेत आहेत.

ठळक मुद्देव्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजणार : २० टेबलवर होणार मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणूक मतमोजणीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २३ मे रोजी होणारी मतमोजणी अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. अमरावती मतदारसंघाचे लोकसभेतील प्रतिनिधी कोण राहणार, याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मतमोजणीदरम्यान व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजाव्या लागणार असल्याने निकाल जाहीर करण्यात विलंब लागेल, असे संकेत आहेत.अमरावती लोकसभेची निवडणूक १८ एप्रिल रोजी पार पडली, तर देशात सातव्या टप्प्यातील मतदान १९ मे रोजी संपत आहे. २३ मे रोजी संपूर्ण अमरावतीकरिता मतमोजणी बडनेरा मार्गालगतच्या नेमाणी गोडाऊनमध्ये होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने लागणाऱ्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण १८ व १९ मे रोजी घेण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांना तब्बल ३५ दिवस निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. विधानसभानिहाय मतमाजेणी होणार आहे. अगोदर अधिकऱ्यांच्या कक्षात चार टेबलवर टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे. टपाली आणि सैनिकांच्या मतपत्रिकांची मोजणी झाल्यानंतर मतदान यंत्रातील मतमोजणीस प्रारंभ केला जाणार आहे.विधानसभानिहाय मतदार संघनिहाय रँडम पद्धतीने (सरमिसळ) लोकसभेत समाविष्ट प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रे अशा एकूण ३० मतदान केद्रांतील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या आणि मतदान यंत्रातील मते मोजली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे निकाल जाहीर करण्यास विलंब लागू शकतो, असे संकेत वर्तविले जात आहेत.व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी ‘इन कॅमेरा’ मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाईल. चिठ्ठी उमेदवारांचे नाव अंकित केलेल्या प्लास्टिक डब्यात टाकली जाणार आहे. त्यानंतर चिठ्ठ्यांच्या एकूण आकड्याची खात्री केली जाईल.- शरद पाटीलउपजिल्हाधिकारी, अमरावती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९